बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर मधील राजश्री इंटरप्राइजेस कार्यालयात दरोडा
बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर मधील राजश्री इंटरप्राइजेस कार्यालयात दरोडा
बोईसर : बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर मधील एका राजश्री इंटरप्राइजेस या खाजगी कार्यालयात शुक्रवारी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास पाच जणांनी सशस्त्र दरोडा टाकून लाखो रुपयांच्या ऐवज लुटला.
ओस्तवाल एम्पायर येथील रिषभ अपार्टमेंट मधील राजू राठौड़ व सुरेश राठौड़ यांच्या राजश्री इंटरप्राईजेस या खाजगी कार्यालयावर दुपारी पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी कार्यालयातील एक महिला आणि एक तरुण यांना दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत त्यांना दोरांनी खुर्चीला बांधून व तोंडाला चिकणपट्टी लावली व कार्यालयातील साडेचार लाख रुपयांचे रोख रक्कम तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व तरुणांच्या गळ्यातील सोन्याची चेन लुटली व त्याच वेळी कार्यालयात चहा घेऊन आलेल्या व्यक्तीच्या हातातील अंगठी सुद्धा त्यांनी काढून घेत पसार झाले.
त्यानंतर कार्यालयातील दोराने हात बांधून ठेवलेल्या एका तरुणाने कशीबशी आपली सुटका करून घेऊन मालकाला फोनवर घडलेली घटना सांगितली. दरोड्याची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहचले. आणि दरोड्याचा तपास सुरू केला. पालघर चे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री पंकज शिरसाठ आणि उपअधीक्षक (गृह ) श्री. शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे, गजानन पडळकर यांना तपासाबाबत सूचना दिल्या. दरोडेखोरांचा लवकरच तपास लावत जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment