कारखान्याचे रासायनिक युक्त पाणी थेट शेतात

कारखान्याचे रासायनिक युक्त पाणी थेट शेतात

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरण नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या Resonance Specialitities ltd या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ मेहेरबान झाला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक T-140. M/S RESONANCE SPECIALITIES LTD  या कंपनीकडून रासायनिक पाण्यावर प्रक्रिया न करीता दिनांक २२/११/२२ रोजी पाम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात खुलेआम रासायनिक पाणी सोडताना झोनल अधिकारी विश्वजीत सोरगे यांनी पकडले होते. यात सदर कंपनीकडून ETP बायपास करत शेतकऱ्यांच्या शेतात खुलेआम घातक रासायनिक पाण्याचे तलाव निर्माण झाल्याचे  निदर्शनास आले होते. तसा अहवाल उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याकडून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला होता परंतु सदर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत वारंवार पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रदुषित कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करता दिसत आहे . तर याआधी ही दिनांक २४/०३/२१ रोजी देखील कंपनीकडून अश्याच प्रकारे घातक रासायनिक पाणी खुलेआम सोडत असल्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती पुन्हा एकदा कंपनी घातक रासायनिक पाणी सोडत असूनही कंपनी ला कारणे दाखवा नोटीस बजावत कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अश्याच औद्योगिक क्षेत्रातील कंपनीकडून खुलेआम पाणी सोडत असलेल्या अनेक कंपनीला टाळेबंदी करत कारवाई झालेली असताना मात्र गेल्या वर्षभरापासून अश्या कारवाईत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुवर्ण मध्य काढत थातूरमातूर कारवाई केली जाते आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक