एका चार वर्षीय चिमुरडीवर तीस वर्षीय नराधमाने केला बलात्कार
एका चार वर्षीय चिमुरडीवर तीस वर्षीय नराधमाने केला बलात्कार
बोईसर : बोईसर पोलीस ठाणे हद्दीत कुंभवली येथील रामजी नगर परिसरात एका चार वर्षीय चिमुरडीवर बाजूलाच राहत असलेल्या एका तीस वर्षीय अंगदकुमार विश्वकर्मा ( नराधमाने बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली असून पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी रात्री ३:२० वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस ठाण्यात पोक्सो आणि संबंधित कायद्यांतर्गत नुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीला उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंगदकुमार विश्वकर्मा (३० वर्षे) मूळचा यूपीचा रहिवाशी असून तो येथे कुटुंबाशिवाय राहतो. याने बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कुंभवली येथील रामजी नगर परिसरात शेजारीच राहत असणाऱ्या एका ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. आरोपील पकडुन लोकांनी चांगलाच चोप दिल्यामुळे, उपचारासाठी आरोपीला बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात रात्री ३.२० वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून बोईसर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.
Comments
Post a Comment