राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : अंडी असल्याचे भासवून दारुची तस्करी, दाेघांवर गुन्हा दाखल
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : अंडी असल्याचे भासवून दारुची तस्करी, दाेघांवर गुन्हा दाखल
पालघर : राज्य उत्पादन शुल्क विभागाची दारू माफियांवर करडी नजर असल्याचे चित्र सध्या संपुर्ण महाराष्ट्रात हाेत असलेल्या विविध कारवाईतून दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने माेठी कारवाई करत सुमारे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दारूची तस्करी कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी माल वाहतुकीच्या गाडीत समोरच्या बाजूस बनावट प्लास्टिकच्या अंड्याचे ट्रे ठेवण्यात आले होते. सुमारे 560 अंड्यांच्या ट्रे मधील 16800 प्लास्टिकची बनावट अंडी हाेती. त्यामागे दमन बनावटीची दारू अशी अनोखी शक्कल लढवून दारूची तस्करी केली जात हाेती.यात पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मनोर वाडा रस्त्यावरील वाघोटे टोलनाक्यावर वाहन अडविले. या वाहनाची तपासणी करुन तब्बल 18 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टेम्पो चालकाला पाेलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आणखी एकाचा शाेध सुरु आहे. या कारवाईमुळे दारूसह वाहतूक होणारी ही प्लास्टिकची बनावट अंडी नेमकी कोणत्या भागात विक्रीस जात होती हे अजूनही स्पष्ट झालं नाही.
Comments
Post a Comment