बोईसर येथील राजश्री ट्रांसपोर्ट मध्ये दरोडा टाकण्याऱ्या चोरांना पकड़ण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश
बोईसर येथील राजश्री ट्रांसपोर्ट मध्ये दरोडा टाकण्याऱ्या चोरांना पकड़ण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश
तांत्रीक पुराव्याच्या आधारे पोलीसांनी आरोपींना केले जेलबंद
बोईसर : बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर मधील राजश्री इंटरप्राइजेस कार्यालयात दरोडा टाकण्याऱ्या चोरांना पकडून स्थानिक गुन्हे शाखा, पालघरकडून दरोड्याच्या गुन्ह्यांची उकल करून तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
दिनांक 03/03/2023 रोजी दुपारी 3.00 वा च्या सुमारास फिर्यादि अजय सदानंद पावडे व साक्षीदार पल्लवी उदय संखे हे राजश्री ट्रान्सपोर्ट बोईसर या ऑफिस मध्ये काम करीत असताना अज्ञात आरोपींनी सदर ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये येवून फिर्यादी व साक्षीदार ह्याना चाकूचा धाक दाखवुन मारण्याची धमकी देवून त्यांचे हात बांधून गळ्यातील चैन, साक्षीदार ह्याच्या सोन्याचे मंगळसूत्र तसेच चहा घेवून आलेला दुकानदार देवीलाल पाटीदार यांच्या हातातील पुष्कराज खड्याची सोन्याची अंगठी असा एकूण 52,000/- रूपये कीमतीचा माल जबरी चोरुन नेला म्हणुन बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व बोईसर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून तपासाबाबत सुचना देण्यात आल्या. सदर पथकापैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक पूराव्याच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसताना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून 3 संशयित इसम 1) वय 54 वर्ष रा. जोशीबाग कल्याण, जि. ठाणे मुळ रा. मालपा डोंगरी, एम.आय.डी.सी, अंधेरी पूर्व, मुंबई 2) वय 39 वर्ष . जोशीबाग कल्याण, जि.ठाणे, मुळ रा. झाशी राज्य, मध्यप्रदेश 3) वय 42 वर्ष रा. बकरेवाली चाळ, नित्यानंद नगर, घाटकोपर, मुंबई. यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. नमूद गुन्ह्यांत 3 आरोपीस अटक करून भादविस कलम. 395,398 अधिक कलमे समविष्ट करण्यात आली असुन पुढील तपास हा सपोनि गजानन पडळकर, बोईसर पोलीस ठाणे हे करित आहे.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, यांच्या आदेशान्वये नित्यानंद झा, सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे,अनिल विभुते, पोलीस निरिक्षक, स्थागुशा, पालघर, सपोनि/ गजानन पडळकर, पोउपनि/ गणपत सुळे, पोउपनि / स्वप्निल सावंतदेसाई, नेम - स्थागुशा, पालघर, पोउपनि / शरद सुरळकर, पोउपनि/ विट्ठल मणिकेरी, तसेच बोईसर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Comments
Post a Comment