सालवड ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथे अनधिकृत बांधकामे जोमात
सालवड ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथे अनधिकृत बांधकामे जोमात
मनोज सिंग यांच्या अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात
बोईसर: सालवड ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथे मनोज सिंग नामक व्यक्तीने फक्त अर्धा गुंड जमिनीवर तळ मजला सहित तीन मजली इमारत उभी करत आजूबाजूच्या नागरिकांचे जीव धोक्यात आणले आहे.
विशेष म्हणजे या बांधकामाला सालवड ग्रामपंचायत सहीत इतर संबंधित विभागांनी बांधकाम परवानगी दिलेली नसून तशी परवानगी घेण्यासाठी मनोज सिंग यांनी संबंधित विभागाकडे विनंती अर्ज देखील दाखल केलेला नाही.
शिवाजी नगर हे तारापूर औद्योगिक क्षेत्रा लगत असून औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात वाढते अपघात पाहता तसेच एखाद्या छोट्याशा भुकंपाच्या झटक्याने संपूर्ण इमारत कोसळून आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाश्यांचे जीव धोक्यात आलेले असताना सालवड ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी गप्प बसले आहेत.
Comments
Post a Comment