Posts

Showing posts from July, 2025

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी बंद दिनानिमित्त नवापूर येथील जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळेत जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न

Image
आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी बंद दिनानिमित्त नवापूर येथील जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळेत जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न बोईसर : "आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी बंद दिवस"निमित्त जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळा, नवापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांच्या सहभागातून अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण रक्षणाविषयी माहिती देणाऱ्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी “प्लास्टिकमुक्त पृथ्वी” या संकल्पनेवर आधारित चित्रं रेखाटली. या चित्रांमधून त्यांनी प्लास्टिकचा अपाय, त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय अत्यंत प्रभावीपणे मांडले. सदर उपक्रमात पालकांनीही हजेरी लावून मुलांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्रांमधून प्लास्टिकच्या वापरामुळे निसर्गावर होणारे परिणाम ठळकपणे व्यक्त झाले. कार्यक्रमात शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती शितल संखे यांनी विद्यार...

शिवशक्ती संघटनेच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे बोईसरमधील वीजपुरवठा सुरळीत

Image
शिवशक्ती संघटनेच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे बोईसरमधील वीजपुरवठा सुरळीत   महेंद्र पार्क व त्रिवेदी कंपाऊंड परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला समाधान बोईसर – बोईसरमधील महेंद्र पार्क व त्रिवेदी कंपाऊंड परिसरातील मुख्य विद्युत ट्रान्स्फॉर्मर अचानक निकामी झाल्यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी नागरिकांना अंधारात दिवस-रात्र काढावी लागण्याची वेळ येत होती. या त्रासातून तात्काळ दिलासा मिळावा, यासाठी शिवशक्ती संघटनेने पुढाकार घेतला. शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष  संजय पाटील यांच्या  नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या बोईसर कार्यालयाशी संपर्क साधून समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. मात्र, सुरुवातीला महावितरणकडून "उद्या ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध करून दिला जाईल," असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. तथापि, संघटनेच्या ठाम आणि आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला तत्काळ पावले उचलावी लागली. केवळ काही तासांतच नविन ट्रान्स्फॉर्मर बसवण्यात आला आणि दोन्ही परिसरांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. या वेगवान आणि प्रभावी हस्त...

ड्रोन सर्वे प्रकरणी डहाणू येथे महत्वपूर्ण बैठक; नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन

Image
ड्रोन सर्वे प्रकरणी डहाणू येथे महत्वपूर्ण बैठक; नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन डहाणू : डहाणू तालुक्यातील वाढवण येथे प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी बंदर प्रकल्पासाठी ITD कंपनीमार्फत सुरू असलेल्या ड्रोन सर्वेला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवत आंदोलन केल्यानंतर, संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, डहाणू येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हाधिकारी महेश सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक व श्रीमती कणसे, सहायक पोलीस निरीक्षक पाचपूते, तसेच बिल्डिंग इन्व्हिरॉन्मेंट कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी उपस्थित होते. याशिवाय वरोर, धाकटी डहाणू, चिंचणी येथील ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक मच्छीमार बांधव देखील उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागरिकांनी वाढवण ग्रिनफील्ड महामार्गासाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनीचा मोबदला अधिक मिळावा, बंदर प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा, तसेच मच्छीमार बांधवांना संभाव्य नुकसानीची भरपाई मिळावी अशा विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांवर प्रतिसाद देताना उपजिल्हाधि...

११ लाखांचा अवैध दारू साठा वाहनासह जप्त; घोलवड पोलिसांची दमदार कारवाई

Image
११ लाखांचा अवैध दारू साठा वाहनासह जप्त; घोलवड पोलिसांची दमदार कारवाई   पालघर  : पालघर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीवर घोलवड पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत ११ लाखांहून अधिक किमतीचा दारूसाठा आणि वाहन जप्त करत एकास अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार करण्यात आली. दिनांक ३० जून २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घोलवड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गुजरात राज्यातून दमण बनावटीची अवैध दारू एका चारचाकी वाहनातून वेवजी-झाई मार्गे वाहून नेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वेवजी बावलपाडा (ता. तलासरी) येथे सापळा रचून संशयित क्रेटा गाडी (क्र. GJ15-CQ5695) थांबवली. वाहनचालक मेहुनकुमार ईश्वर पटेल (वय २७, रा. उंबरगाव, जि. वलसाड, गुजरात) याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, त्यात २,०१,९६०/- रुपये किमतीच्या दमण बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. वाहनासह एकूण ११,७६,९६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी घोलवड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९४/२०२५ अन्वये महारा...

बोईसर ग्रामपंचायतीतील युती सरकार डळमळीत

Image
बोईसर ग्रामपंचायतीतील युती सरकार डळमळीत  भाजपमधील अंतर्गत वादांमुळे नवे समीकरण उभे राहणार? बोईसर : बोईसर ग्रामपंचायतीतील युती सरकारच्या स्थिरतेवर सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी, आगामी काळात युती तुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली होती. सरपंचपदासाठी भाजपकडून दिलीप धोडी आणि सोनाली दुमाडा हे दोन उमेदवार मैदानात होते, तर बहुजन विकास आघाडीचे अनिल रावते यांनीही जोरदार लढत दिली होती. मोजणीत झालेल्या गोंधळानंतर अखेर हरकतीनंतर दिलीप धोडी यांची सरपंचपदी अधिकृत घोषणा करण्यात आली. शिवसेनेच्या शिंदेगटाच्या निलम संखे यांची बिनविरोध सदस्य व उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर धोडी-संखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विविध विकासकामे राबवली. मात्र अलीकडे सरपंच धोडी यांची प्रकृती खालावल्याने कार्यभार प्रभारी सरपंच निलम संखे यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान, भाजपमधील दुसरा गट पुन्हा सक्रीय झाला असून, पूर्वी धोडी य...

पालघर पोलिसांची धडक कारवाई : बोईसरमधून १२ किलो गांजासह झारखंडचा युवक अटकेत

Image
पालघर पोलिसांची धडक कारवाई : बोईसरमधून १२ किलो गांजासह झारखंडचा युवक अटकेत पालघर – जिल्ह्यात अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने बोईसर परिसरात मोठी कारवाई करत १२ किलोहून अधिक गांजासह एक आरोपी अटक केला आहे. दि. ३० जून २०२५ रोजी पालघर गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बोईसर येथील धोडीपुजा, मयुर धोडी चाळीत अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आले. माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. छाप्यात आरोपी पंजु समरा कुजर (वय ३५, मूळ रा. मांडर, जि. रांची, झारखंड) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १२ किलो ७८० ग्रॅम वजनाचा, १ लाख २७ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(II) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र गावडे करत आहेत. सदरची कारवाई यतिश देशमुख, पोलीस अध...