मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आनंदाची भेट
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना आनंदाची भेट
बोईसर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कुंभवली गावात सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळा कुंभवली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
२२ जुलै रोजी झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला आणि चॉकलेट वाटप करून आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव आणि परिसरात पसरलेले उत्साही वातावरण या उपक्रमाचे खरे यश ठरले.
या उपक्रमाचे आयोजन भाजप जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विशेषतः कुंभवली ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजप कार्यकर्ते अॅड. सुमित रमाकांत पिंपळे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला.
कार्यक्रमात पालघर पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रणय म्हात्रे, हर्षल पिंपळे, नांदगावचे माजी उपसरपंच सुमित ठाकूर, चिराग संखे आणि कल्पेश पिंपळे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. याशिवाय भाजप कार्यकर्ते, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळावे आणि त्यांच्यात शिक्षणाविषयीची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने राबवण्यात आलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला असून गावकऱ्यांनी याचे मनःपूर्वक कौतुक केले.
Comments
Post a Comment