नीट चाचणीत कमी गुण मिळाल्याने वडिलांकडून बेदम मारहाण; विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षक वडील अटकेत

नीट चाचणीत कमी गुण मिळाल्याने वडिलांकडून बेदम मारहाण; विद्यार्थिनीचा मृत्यू, शिक्षक वडील अटकेत

सांगली नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे संतापलेल्या शिक्षक वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षक वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव साधना धोंडीराम भोसले (वय १७) असे असून, ती बारावीची विद्यार्थीनी होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या साधनाने दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवले होते. मात्र अलीकडे झालेल्या नीटच्या सराव परीक्षेत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले.


या बाबत तिच्या वडिलांनी विचारणा केली असता साधनाने “तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालात?”, असे उत्तर दिले. यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी लाकडी खुंट्याने तिच्यावर बेदम मारहाण केली. पत्नीने मध्यस्थी करून त्यांना थांबवले तरी रात्रीपर्यंत मारहाणीचा सिलसिला सुरूच होता. दुसऱ्या दिवशी योग दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत गेलेले भोसले घरी परतल्यावर साधना बेशुद्धावस्थेत आढळली.


भोसले यांनी तिला सांगलीतील खासगी रुग्णालयात नेले आणि “बाथरूममध्ये पाय घसरून पडली” असे खोटे सांगून उपचार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच साधनाचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात शरीरावर ठिकठिकाणी मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी साधनाची आई आणि इतरांच्या जबाबांवरून आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे.


या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शिक्षक वडिलांकडून अशी कृती झाल्याचे दुःखद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुलीच्या मृत्यूमुळे एक हौशी स्वप्न अर्धवट राहिले आहे. पोलिस तपास सुरू असून, पुढील कारवाई केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक