बोईसर स्टेशनजवळ फाटलेला बॅनर तारेवर लटकला; प्रवाशांच्या सुरक्षेला धोका"

बोईसर स्टेशनजवळ फाटलेला बॅनर तारेवर लटकला; प्रवाशांच्या सुरक्षेला धोका"

बोईसर – बोईसर रेल्वे स्टेशनजवळील एका व्यावसायिक इमारतीवर लावलेला जाहिरात बॅनर फाटून थेट रस्त्यावरच्या तारेवर लटकताना आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या रस्त्यावरून रोज हजारो प्रवासी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या बॅनरमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

सदर बॅनर हवेमुळे तुटून अर्धवट लोंबकळत आहे. या ठिकाणी नेहमीच रहदारी असून, जर हा बॅनर थेट रस्त्यावर पडला असता, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. विशेषतः वृद्ध, महिला व विद्यार्थी वर्गाला याचा फटका बसू शकतो.

सध्या शहरातील अनेक भागांत अनधिकृत आणि असुरक्षित पद्धतीने बॅनर्स लावले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बॅनर्सना ना परवानगी असते ना योग्य देखभाल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.


नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली असून, अशा बॅनर्सवर कारवाई करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अशा प्रकारच्या धोकादायक बॅनर्स हटवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक