संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; आदिवासी बांधवांसाठी पालघरमध्येच अपील अर्ज स्वीकारले जाणार

संजय पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; आदिवासी बांधवांसाठी पालघरमध्येच अपील अर्ज स्वीकारले जाणार

पालघर – श्रमिक सेनेचे चिटणीस संजय पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, आता आदिवासी बांधवांना अपील अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईच्या कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. हे अर्ज थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वीकारले जाणार आहेत.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. जमिनीच्या मालकी हक्कांशी संबंधित अपील अर्ज दाखल करण्यासाठी आदिवासी बांधवांना कोकण आयुक्त कार्यालय, मुंबई येथे जावे लागत होते. हा प्रवास खर्चिक, वेळखाऊ व त्रासदायक ठरत होता.


या समस्येची गांभीर्याने दखल घेत संजय पाटील यांनी जून 2025 मध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत ही मागणी जोरदारपणे मांडली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून हा निर्णय अंमलात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, 8 जुलै 2025 रोजी शासनाने संबंधित आदेश निर्गमित केला.


या आदेशानुसार, आता कोकण विभागीय आयुक्त 

कार्यालयातील अधिकारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहून अपील अर्ज स्वीकारतील. त्यामुळे स्थानिक पातळीवरच आदिवासी बांधवांना न्यायाची प्रक्रिया सुलभ होणार आहे.


संजय पाटील यांनी केवळ मागणी करून थांबण्याऐवजी तिच्या अंमलबजावणीसाठी यशस्वी प्रयत्न करत आपल्या कार्यतत्परतेची आणि जनहितासाठी असलेल्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक