कॅलेक्स कंपनीकडून तयार उत्पादनाची बेकायदेशीर वाहतूक करणारा फोरक्लीप बोईसर पोलिसांच्या ताब्यात !
कॅलेक्स कंपनीकडून तयार उत्पादनाची बेकायदेशीर वाहतूक करणारा फोरक्लीप बोईसर पोलिसांच्या ताब्यात ! पामचे उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या सतर्कतेमुळे बोईसर पोलिस व प्रदूषण विभागाची कारवाई सुरू क्राईम अलर्ट: स्वप्निल पिंपळे बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅलेक्स केमिकल कंपनीकडून वारंवार पर्यावरण नियमांचे उल्लंघन केले जात असतानाच आज पुन्हा एकदा तयार उत्पादन बेकायदेशीर वाहतूक करणारा फोरक्लीप बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दिनांक १ जून २०२३ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान प्लॉट क्रमांक एन १०२/९१ या कारखान्यातून तयार उत्पादन (lumefantrine) कागदपत्रे तयार न करता तसेच आर टी ओ विभागाकडून साहित्याची वाहतूक करण्याची परवानगी नसताना फोरक्लीप वाहनातून बाहेर वाहतूक करत असताना पाम ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या निदर्शनास येताच बोईसर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारखानाला WHO तसेच USFDA या दोन राष्ट्रीय मान्यताप्राप्त दर्जा असताना सदर उत्पादन उचित कागदपत्रे तयार न करता बेकायदेशीर वाहनातून बेकायदेशीर वाहतूक करत असताना या कारखानाला काळ्या यादीत का टाकू नये ? पोलि...