श्री.कुलस्वामिनी पिंपळदेवी मातेचा वार्षिक उत्सव पाम गावात संपन्न

श्री.कुलस्वामिनी पिंपळदेवी मातेचा वार्षिक उत्सव पाम गावात संपन्न 

बोईसर : श्री. कुलस्वामिनी पिंपळदेवी माता मंडळ पाम तर्फे पाम गावात वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 07/05/2023 रोजी वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने श्री. कुलस्वामिनी पिंपळदेवी मातेचे विविध कार्यक्रम सकाळी सात वाजे पासून सुरु करण्यात आले होते यात गणेश पूजन, कुलदैवत अभिषेक, हवन पुजन, कलश रोहण, सत्यनारायण पुजा, महाप्रसाद, देवी चरणी अर्पण केलेल्या साडी व ब्लाउजपीस लिलाव व पालखी सोहळा असे संध्याकाळ पर्यंत विविध कार्यक्रमात वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील वंजारी समाजात पिंपळे, वडे, संखे, पाटील असे वेगवेगळे आडनाव आहेत परंतु सर्वाची कुलदैवत ही अलगअलग असुन पाम गावात शेतात असण्याऱ्या पिंपळदेवी माता ही अलग अलग वंजारी गावातील लोकांची कुलदैवत असुन कोणतेही शुभकार्य जसे लग्न, जायवळ, लहान मुलांचे कान टोचने अश्या प्रकार चे शुभकार्य करताना पहिले देवीची पुजा करुन कार्य पूर्ण केले जाते.



श्री. कुलस्वामिनी पिंपळदेवी वार्षिक उत्सवात भुषण व राजेंद्र पंढरीनाथ पिंपळे यांनी मंदीर सजावट च काम केल, तृप्ती रमाकांत पाटील यांच्या कडून प्रसाद सेवा (लाडू ) देण्यात आले होते, मयूर विलास पिंपळे यांच्या कडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती तसेच भंडाऱ्याचे आयोजन कोलवडे गावातील वसंत दादु पिंपळे, कमळाकर दादु पिंपळे, भावेश खंडेराव पिंपळे, राहुल खंडेराव पिंपळे, यांच्या परिवारा तर्फे देण्यात आले होते.

तसेच श्री. कुलस्वामिनी पिंपळदेवी मातेची पालखी ही संध्याकाळी संपूर्ण गावात फिरवण्यात आली यावेळी  सर्वानी फटाक्याच्या आतीषबाजीत व बैंजो लावून नाचत गाजत गावात मिरवणुक काढण्यात आली.यावेळी प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच काही महिलांनी एकाच रंगाच्या साड्या घालण्यात आल्या असुन  आंनदी आळीतील मुलांनी निळ्या रंगाचा कुर्ता घालून वार्षिक उत्सव आंनदात साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी