1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त श्रमप्रतिष्ठान संस्था मासवण तर्फे आदर्श श्रमिक महिला गुणगौरव सोहळा संपन्न
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त श्रमप्रतिष्ठान संस्था मासवण तर्फे आदर्श श्रमिक महिला गुणगौरव सोहळा संपन्न
बोईसर : 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त श्रमप्रतिष्ठान संस्था मासवण संचलित पाम-कुंभवली विभाग हायस्कूल ,पाम-टेंभी येथे कै.सौ. प्रभावती (विमल संखे) प्रदीप पिंपळे यांच्या स्मरणार्थ आदर्श श्रमिक महिला गुणगौरव सोहळा- 2023 हा सोहळा पाम-कुंभवली विभाग हायस्कूल ,पाम-टेंभी शाळेत उत्कृष्ट नियोजनबद्ध रीतीने आयोजित करण्यात आला होता.
गेल्या 10 वर्षांपासून *श्रमप्रतिष्ठान संस्था मासवण * संचलित "पाम-कुंभवली विभाग हायस्कूल ,पाम-टेंभी " येथे 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करताना श्रमाची प्रतिष्ठा व कष्टकरी श्रमिकांचा आदर करून एक आगळा वेगळा उपक्रम दरवर्षी पंचक्रोशीतील गावांमधून आदर्श श्रमिक महिलेचा निवड करून त्यांचा यथोचित गुणगौरव व सत्कार करून संपन्न केला जात असतो. यावर्षीच्या ह्या सोहळ्याच्या मानकरी होण्याचा मान श्रीमती मंदा कन्हैया चौहान या टेंभी गावच्या निराधार व कष्टकरी महिला यांना मिळाला. त्याचप्रमाणे या सोहळ्याची मानकरी ठरलेल्या श्रीमती मंदा कन्हैया चौहान यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मे. बजरंग इंटरप्राईजेस चे मालक व पाम ग्रामपंचायतीचे उपसरपंच मनोज पिंपळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पाम गावचे सुपुत्र, व्ही.शार्प मॅग्नेट या कंपनीचे डायरेक्टर या उच्च पदावर कार्यरत असणारे प्रशांत संखे विराजमान असून यांच्या शुभ हस्ते श्रीमती मंदा कन्हैया चौहान यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ श्रीफळ, व जिव्हाळ्याची साडी सोबत रोख रक्कम 501/- देताना पाम गावच्या सरपंच दर्शना पिंपळे व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत योग्य सत्कार व गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रामकृष्ण पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्व विशद केले तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री सचिन वेस्ता संखे व आभारप्रदर्शन राहुल शेवाळे यांनी केले.
Comments
Post a Comment