शिवसेना पालघर जिल्हा व आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने 235 आदिवासी वधु-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
शिवसेना पालघर जिल्हा व आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने 235 आदिवासी वधु-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल याचा कंपन्यांनी विचार करावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर : शिवसेना पालघर जिल्हा व आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने 235 आदिवासी व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील वधु-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा 2023 बोईसर येथील सर्कस ग्राउंड येथे शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र सिंग व सचिव जगदीश धोडी यांच्या उत्तम नियोजनात आंंनदात पार पडला.
लग्न हा आंनदाचा प्रसंग असतो परंतु आर्थिक परिस्थितिमुळे सगंळ्यानाच लग्न थाटामाटात करता येत नाही त्यामुळे समाजाचे उत्तरदायित्व समजून आणि आपली सामाजिक बांधिलकी समजून अश्या प्रकारचा सामूहिक सोहळा करतात तसेच प्रत्येकाला स्वता:च्या लग्नात कोणी प्रतिष्ठित लोक यावे असे वाटत असते परंतु आर्थिक परिस्थिति चांगली नसते त्यामुळे अश्या सामुहिक सोहळा करुन हा सर्वाच्या साक्षीने केले जाते तसेच आपल्या जीवनातील एक महत्वाचा सोहळा म्हणजे लग्न सोहळा आहे. लग्न म्हणजे दोन परिवार एकत्र येत असतात इथुनच सामाजिक बदलाची सुरवात होते म्हणुन सामाजिक जबाबदारीच्या भावनेतुन अश्या कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जुन उपस्थित राहावे तसेच अश्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे आणि अश्या सामान्य कुटुंबाना सामुहिक विवाह आधार बनतो. या भव्य सामुदायिक विवाह सोहळा 2023 हा आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा देऊन त्यांना काही जीवना आवश्यक वस्तु ही देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमात सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली तसेच शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राचे सहा हजार रुपये व राज्य सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकरी बांधवांना देण्यात येतात व या भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बांद्रा वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल तसेच कामगारांसाठी १५० बेडचे ईएसआय हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टल हायवे ॲक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प दिले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
यावेळी आमदार रवींद्र फाटक,, राजेश पाटील, श्रीनिवास. वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके , जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
◼️2000 नोट बंदी वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
नोटबंदी हा निर्णय आरबीआयचा असून तो काय सरकारचा किंवा पक्षाचा नाहीये. त्यामुळे विरोधकांनी उगाचच यावर चर्चा करू नये. नोटबंदीसाठी आरबीआय ने मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होणार नाही. विरोधकांकडे नोटा जास्तीच्या असतील म्हणून त्यांना त्रास होतो की काय असा टोला या वेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला .ते बोईसर येथे आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधला
◼️ पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील असून वेगवेगळ्या कंपन्यांच्या सीएसआर मधून येथील आरोग्य व्यवस्था सुदृढ करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं .
◼️ स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार दया
यावेळी बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली असून स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल याचा कंपन्यांनी विचार करावा अस आवाहन केलं तसेच कोणी त्रास देत असेल तर थेट आमच्याशी संपर्क करा आम्ही रोजगार देणाऱ्यांच्या पाठीशी आहोत असं आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित कंपनीत मालकांना दिला होता.
Comments
Post a Comment