पाम गावातील गावदेवी नवीन जिर्णोद्धार मंदिर उद्घाटन व गावदेवी माता प्रतिष्ठापणा सोहळा उत्साहात संपन्न
पाम गावातील गावदेवी नवीन जिर्णोद्धार मंदिर उद्घाटन व गावदेवी माता प्रतिष्ठापणा सोहळा उत्साहात संपन्न
बोईसर : पाम गावात दिनांक २८ व २९ मे रोजी गावदेवी नवीन जिर्णोद्धार मंदिर उद्घाटन व गावदेवी माता प्रतिष्ठापणा सोहळा गावदेवी मंदिर मंडळ यांच्या उत्तम नियोजनात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पाम गावात गावदेवी मातेच्या सोहळ्या निमित्त पहिल्यादाच एवढ्या मोठ्या यात्रेच आयोजन करण्यात आले होते पाम गावाच्या मैदानावर यात्रेसाठी मनोरंजनाची वेगवेगळी साधने आणली होती यात लहान मुलांचे आकर्षण असलेले आकाश पाळण्यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई सजलेले होते यात खेळण्याचे स्टॉल, जंम्पिग पैड, खाद्य पदार्थाचे स्टॉल, ट्रेन अश्या वेगवेगळ्या मनोरंजन साहित्य सहित लोकांनी गर्दी करुन कार्यक्रमाच आनंद घेतला.
यात रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी आठ वाजता प्रथम गणेश पुजन अधीर देवतांची स्थापना करून दुपारी १२ वाजेपासून मंदिर देवतांचे पुजन, मूर्तीचे जलाधिवास, दुपारी महाप्रसाद भंडारा व सायंकाळी मूर्तींची संपूर्ण गावात वाजत गाजत गावाती नाजत मिरवणूक काढण्यात आली होती व रात्री महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आले होते. तसेच सोमवार दिनांक २९ मे रोजी सकाळी सात वाजेपासून विविध देवतांचे पुजन ग्रहयज्ञ मुख्य देवतांचे हवन मंदिर कलश, ध्वजारोहण ( बाबा प्रकाशानंद काशी मथुरा यांच्या हस्ते) मुर्ती स्थापना बलिदान पुर्णाहुती महाआरती उपस्थित पाहुण्यात देणगीदारांचे स्वागत करण्यात आली नंतर दुपारी महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आला होता व ४ वाजता देवीच्या साडी लिलाव करण्यात आले व सायंकाळी गावदेवी मातेची भव्य पालखी ची गावात मिरवणूक काढण्यात आली यात फटाक्याच्या आतीष बाजीत व बैंजो लावून नाचत गाजत गावात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच काही महिलांनी एकाच रंगाच्या साड्या घालण्यात आल्या व रात्री महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आला होता.
यात गावदेवी मंडळाचे अध्यक्ष विनोद पिंपळे व मंदिर बांधण्याच काम करणारे मंडळाचे खजिनदार किशोर पिंपळे यांनी विशेष लक्ष देऊन तसेच गावदेवी मंदिर मंडळाने कमीत कमी वेळात भव्य व सुंदर पाम गावदेवीचे मंदिर बाधल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment