बोईसर येथील टाटा हाउसिंग कॉलनीतील 19 वर्षीय मुलगी बेपत्ता
बोईसर येथील टाटा हाउसिंग कॉलनीतील 19 वर्षीय मुलगी बेपत्ता
पालघर - बोईसर शहरातील एक १९ वर्षीय तरुणी गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. प्रिया भास्कर सिंग असे बेपत्ता तरुणीचे नाव असुन प्रिया ही बोईसर शहरातील पूर्वेकडील टाटा हाऊसिंग कॉलनीत मामाच्या घरी राहत असुन गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कचरा टाकण्यासाठी फ्लॅटवरून खाली गेली होती. मात्र बराच वेळ ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र, प्रिया आढळून आली नाही.म्हणून दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल रोजी बोईसर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली असता, ज्याचा हरवलेल्या नोंदीचा क्रमांक आहे. 41. /2023 आहे.
सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांतून बेपत्ता झालेल्या प्रिया सिंगचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत परंतु अजुन पर्यत प्रिया सिंगबाबत काहीही सापडलेले नाही. तसेच बेपत्ता मुलीच्या काकाने सांगितले की, प्रिया यापूर्वीही बेपत्ता झाली होती. ती असे का करते हे काहीं समजत नाही, तिला अधिक मोकळे व्हायला आवडते. ती सहा महिन्यांपूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये ही बेपत्ता झाली होती, त्यानंतर काही दिवसांनी ती दिल्लीतील सुधारगृहात सापडली होती. परंतु यावेळी अजुन पर्यत काही माहिती मिळाली नसल्याने पोलीस तपास सुरु आहे.
Comments
Post a Comment