नालासोपारा पेक्षाही वाईट परिस्थिति बोईसरची
नालासोपारा पेक्षाही वाईट परिस्थिति बोईसरची
बोईसर : बोईसर शहरातील भैयापाडा, यशवंत सृष्टी, ओस्तवाल एम्पायर अश्या वेगवेगळ्या ठिकाणी 24 तासात चाकू व कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडल्या असुन त्याचे व्हीडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया वर व्हायरल होत आहे त्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असुन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते या प्रकरणी पोलीसांनी गुन्हे दाखल करुन तिघांना अटक केले आहे. या विषयी स्थानिक नागरिकांनी टिमा हॉल मध्ये बैठक आयोजित केली होती यात वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली.
बऱ्याच वर्षापासून बोईसर येथे सर्व जातीचे धर्माचे लोक चांगल्या पद्धतीने राहतात परंतु गेल्या चार पाच वर्षापासून नव्याने आलेले काही विकृत बुद्धिच्या लोकांमुळे बोईसरच वातावरण खराब होताना दिसत आहे. तसेच बोईसर मधील अवधनगर येथील शासकीय भूखंडावर अवैध धंदे चालतात तर या व्यवहारात हाती रोजच रोकड येत असल्यामुळे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक अम्लीय पदार्थांचे सेवन करत अवधनगर सहित बोईसर गुन्हेगारीचा अड्डा बनवला आहे. तसेच बोईसर, सरावली, खैरेपाडा, सालवड सारख्या ग्रामपंचायत हद्दीतील टप्पऱ्यानवर ग्रामपंचायत 50 रूपये पावती फाडत असेल तर काही दलाल यांच्या कडून महिन्याला 3 ते 4 हजार रूपये घेत असतात अश्या दोन नंबर च्या कामामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढले असुन यांना कोणाचाही धाक राहिलेला नसल्यामुळे अशा घटना घडत असून अश्या लोकांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे तसेच अश्या विकृत लोकांना तडीपार करा नाहीतर बोईसर बंद करू तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा क्रिमिनल रिपोर्ट घेणे गरजेचा असुन शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दोषीवर कठोर कारवाई करण्याची मांगणी देखील या सभेत चर्चे दरम्यान करण्यात आली.
Comments
Post a Comment