शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वांणगाव तर्फे बोईसर मध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे आयोजन

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वांणगाव तर्फे बोईसर मध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे आयोजन

पालघर : मा.ना.श्री मगंल प्रभात लोढा, मंत्री कौशल्य विकास रोजगार,उदयोजकता व नाविन्यता विभाग यांच्या संकल्पनेतून संपुर्ण राज्यभर दिनांक ०६ मे २०२३ ते दिनांक ०६ जून २०२३ या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे संपूर्ण राज्यभरातील 288 विधानसभा मतदारसंघात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामार्फत विधानसभा मतदार संघ निहाय आयोजन केलेले आहे. त्यानुसार डी.ए.दळवी संचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र् राज्य मुबंई तसेच  कि.वा.खटावकर, सहसंचालक प्रादेशिक कार्यालय मुबंई यांच्या मार्गदर्शनानुसार व निर्देशानुसार, महेशकुमार दयांनद सिडाम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली  बोईसर विधानसभा मतदारसंघातील औ.प्र.संस्था वानगाव यांच्या मार्फत दिनांक 18 मे 2023 रोजी वंजारी समाज हॉल अमेय पार्क नवापूर रोड बोईसर , जि.पालघर येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीराचे आयोजन केले होते, राजश्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर  शिबिराचे उद्घाटन मा.श्री राजेश पाटील आमदार बोईसर विधानसभा मतदारसंघ  हस्ते करण्यात आले.

 सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय टी आय वानगाव चे प्राचार्य संजय भोई हे होते. करियर शिबिर प्रमुख उपस्थित प्रभाकर पाटील, सरपंच ग्रापंचायत उमरोळी, नागेश पाटील संचालक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,अनिल रावते पंचायत समिती सदस्य,अजित राणे व्यवस्थापक कॅम्लिन कंपनी हे होते. सदर कार्यकमाचे प्रास्तविक संस्थेचे प्राचार्य चंदन बंजारा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री राजेश पाटील, आमदार बोईसर विधान सभा मतदारसंघ यांनी उपस्थित युवक व युवतींना स्वता:च्या जीवनातील अनुभवाचे अनेक प्रसंग सागून शिक्षणाचे महत्व तसेच पुर्वीच्या काळी शिक्षण घेण्याकरीता किती कष्ट घ्यावे लागत होते व आता शिक्षण घेणे किती सुलभ झाले आहे आहे याची जाणीव उपस्थितांना करुन दिली. त्याचप्रमाणे इयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी करीअरची निवड कशी करावी याचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे वेगवेगळया विभागात रोजगाराच्या असलेल्या संधी स्वबळावर कश्या मिळवाव्यात याकरीता मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आय टी आय पास झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळण्यासाठी तसेच करियर शिबिर शहरा सोबत ग्रामीण भागातही जनजागृती करावी यासाठी पुढाकार घेतला जाईल. परिसरातील मागणी नुसार बोईसर इंडस्ट्री आशिया खंडात एक नंबरची आहे त्यादृष्टीने या परिसरात असलेले औद्योगिक आस्थापना नुसार आय टी आय मधे नवीन व्यवसाय सुरू झाले पाहिजे त्यानुसार केमिकल,पेंटर, लिफ्ट मेकॅनिक सुरू करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर मागणी करण्यात येईल आणि स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा पुढाकार घेतला जाईल. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमास उपस्थित प्रशिक्षणार्थी व पालकांना अजित राणे व्यवस्थापक  कॅमिलन कंपनी बोईसर यांनी करीअर संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

  त्यानंतर सदर कार्यक्रमाकरीता समुपदेशक म्हणून उपस्थित असलेले समुपदेशक सुधीर पाटील,  जिल्हा समन्वयक ,श्रीमती श्वेता निखा, समुपदेशक , श्रीमती जयश्री गायकवाड , समुपदेशक श्रीमती पल्लवी जोशी समुपदेशक यांनी  उपस्थित युवक युवतींना करीअर  संदर्भात इंटरनेटवरील रोजगारासंदर्भातील व उच्च शिक्षणासंदर्भांतील वेगवेगळया साईटस , शिष्यवृतीद्वारे पुढील शिक्षण घेण्याच्या संधी ,वेगवेगळया रोजगारा संदर्भात शासकीय योजनांची माहीती , स्पर्धा परीक्षा, एम.पी.ए.सी.व यु.पी.ए.सी परीक्षा इ.बाबत उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना पुढील जिवनात एक नवीन दिशा शोधण्यासाठी उपयोगी पडेल असे मोलाचे मार्गदर्शन  केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण संजय भोई यांनी केले.  सदर भाषणात त्यांनी करिअर संदर्भात उपस्थित युवक / युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले. पालघर जिल्ह्यात आय टी आय वानगाव येथे दर तीन महिन्यांनी रोजगार मेळावा आयोजित केला जातो आय टी आय पास झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केले जाते व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात अशी माहिती  संजय भोई यांनी दिली.

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर साठी बोईसर विधान सभा मतदारसंघातून 775 विद्यार्थी व पालक उपस्थित राहून करियर शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिराचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत भंगाळे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रशांत बोकंद गटनिदेशक,  योगेश तुमडे कार्यालयीन अधीक्षक, प्रशांत पिंपळे व संस्थेतील कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक