अवैध दारूची विक्री करण्याऱ्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
अवैध दारूची विक्री करण्याऱ्या आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पालघर : दिनांक 20/05/2023 रोजी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आझाद ऊर्फ नसीमउद्दीन निझामउद्दीन हाफेस रा. नवसारी गुजरात हा खानवेल येथून वेगवेगळ्या मोटार कारमध्ये अवैध्यरित्या वेगवेगळ्या प्रकारची दारू भरून ती जव्हार - मोखाडा मार्ग धुळे येथून गुजरात राज्यात विक्रीकरिता घेवून जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अनिल विभूते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व संजयकुमार ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, मोखाडा पोलीस ठाणे यांना वेगवेगळी पथके तयार करून कारवाई चे आदेश दिले त्याअनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील निळमाती येथे नाकाबंदी सुरु केली नाकाबंदी दरम्यान संशयित वाहने चेक करत असताना दिनांक 21/05/2023 रोजी रात्री 03.35 वा. चे सुमारस जव्हार बाजुकडून संशयित स्कॉर्पियो कार क्रमांक एम.एच.02/सी.बी /4607 ही गाडी न थांबता नाकाबंदीला लावलेले बैरीकेट्स उडवून पळून जात असताना नाकाबंदी करीत असलेल्या अंमलदारांनी गाडीचा पाठलाग करुन पकडले असता कारमधील चालक अमृतलाल परमानंद दोडेजा वय 45 वर्ष रा. तुलसीवन चाल, पहली गल्ली, छापरा रोड, नवसारी, गुजरात याने पोलीसांना धक्काबुक्की करुन पळून जाण्याचा प्रयन्त करत असताना त्याला ताब्यात घेवून त्यांच्या कारमधील मालाबाबत विचारले असता त्याने त्यांच्या स्कॉर्पियो मध्ये व मागील फॉरच्युनर व इनोव्हा या गाडीत खानवेल येथून दमन बनावटीची दारू अवैध्यरित्या विनापरवाना भरून ते धुळे मार्ग गुजरात राज्यात नेवून विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याचे सांगितले त्यानंतर पाठीमागे असलेली फॉरच्युनर गाडी क्रमांक जी.जे.01/के.क्यु /2728 मधील चालक ललितकुमार रामुभाई सुमड वय 37 वर्ष रा. राकेशभाई चाळ रूम नं.8, उधवाडा, वापी, गुजरात याला ताब्यात घेतले व मागून आलेली इनोव्हा कार क्र. एम.एच.02/सी.एच/1948 हिला थांबण्याचा इशारा दिला असता चालक व बाजूला बसलेला इसम जंगलात पळून गेले त्याचा जंगल परिसरात शोध घेतले असता ते मिळून आले नाही.
सदर ताब्यात घेण्यात आलेले दोन इसम व अवैध दारू कारवाईत बनावटीची रॉकफोड व्हिस्की, मास्टर ब्लेंडर व्हिस्की, ऑल सीजन रिझर्व व्हिस्की, रॉयल स्प्रेशन प्रीमियम व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की रॉयल चॅलेंज स्टॉंग बियर, सुपरस्टार स्टॉंग बियर जप्त करण्यात आली तर तीन चार चाकी स्कॉर्पियो , फॉरच्युनर, इनोव्हा मोटार व मोबाईल फोन सहित मोखाडा पोलीस ठाणे येथे आणुन एकूण 39,15,280 रूपये कीमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा संजयकुमार ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, मोखाडा पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार जव्हार विभाग संजय पिंपळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे, पोलीस उपनिरीक्षक संजय भुयार ,पोलीस उपनिरीक्षक सुनील नलावडे, पोलीस हवालदार नरेश आबाजी जनाठे, पोह सुर्यवंशी, पोलीस शिपाई संदेश राजगुरे, पोलीस नाईक बोये, पोलीस नाईक एस पी पिठोले व मोखाडा पोलीस पार पाडली
Comments
Post a Comment