पालघर लोहमार्ग पोलीसांना सराईत मोबाईल चोराला पकडण्यात आले यश

पालघर लोहमार्ग पोलीसांना सराईत मोबाईल चोराला पकडण्यात आले यश 

पालघर : बोईसर येथील जिज्ञेस मनोज संखे (वय २५) रा. कुंभवली रामजीनगर, बोईसर याला पालघर लोहमार्ग पोलीसांनी बोईसर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा मोबाईल फोन जबरीने खेचून पळून जात असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदार आणि बोईसर स्थानकावर कर्तव्यावर असणारे अंमलदार यांनी पाठलाग करून पकडण्यात यश आले आहे.

देवु तान्हया हाडळ वय वर्ष ४५ हे दिनांक 02/05/2023 रोजी डहाणू येथे जाण्यासाठी विरार रेल्वे स्टेशन प्लेटफार्म क्र. 04-ए वरून दुपारच्या तीन वाजून पाच मिनिटांनी सुटणारी विरार डहाणू लोकल गाडी प्लेटफार्म क्रमांक चार वरून पकडली असता सदर लोकल गाडी ही 15.49 वा गाडी बोईसर येथील प्लेटफार्म क्रमांक 01  वर साईडिंगला उभी असताना फिर्यादी यांचा मोबाईल नेसते शर्ट खिशात ठेवुन बसले असताना गाडी सुमारे 15.52 वा दरम्यान गाडी सुरु झाली असता आरोपी जिज्ञेस संखे याने रेल्वेतील प्रवासी देवु हाडळ यांच्या खिशातील मोबाईल जबरीने खेचून चालत्या गाडीतून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केेला. त्यादरम्यान  गुन्हे शोध पथकातील अंमलदार व  स्टेशन ड्यूटीवरील अंमलदार यांनी आरोपी च्या पाठलाग करून आरोपीला पकडुन  त्याची अंगझडती घेतली असता सदर चोरी केलेला मोबाईल त्याच्या कडून जप्त करण्यात आला सदर आरोपी जिज्ञेस संखे विरोधात देवु हाडळ यांनी तक्रार दिल्याने पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   सदर आरोपी जिज्ञेस संखे हा बोईसर पोलीस ठाणे येथील रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे नोंद आहेत तरी आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करीत आहेत

सदर ची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त सो, लोहमार्ग मुंबई रविद्र शिसवे, मा.पोलीस उपायुक्त सो. संदीप भाजीभाकरे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त सो.वसई विभाग, लोहमार्ग मुंबई बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नरेश रणधीर, सपोफौ/मोरे,  पोलीस नायक विशाल गोळे, राहुल भोईटे ,पोलीस शिपाई, अजय शेंडगे,अतुल कुटे, शरणबसप्पा  धमदे, वैभव पाडळे, व शाम भोईर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी