पाम गावाजवळ कार बाईकचा भीषण अपघात, अपघातात दोन जणाचा मृत्यु

पाम गावाजवळ कार बाईकचा भीषण अपघात, अपघातात दोन जणाचा मृत्यु

बोईसर : दिनांक २१ मे रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान बोईसर नवापूर मार्गावरील पाम येथे एक भरधाव कार व दुचाकीमध्ये‌ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालेला असून औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात काम करून सुट्टी झालेल्या दोन कामगार आपल्या  नवापुर येथील घरी जात असताना नांदगाव- आलेवाडी समुद्र किनारी मौज मस्ती करण्यासाठी गेलेल्या दारूच्या नशेत बेधुंद असलेल्या भरधाव कार चालकांनी जोरदार धडक देत या तरुणांना जागीच चिरडले आहे. 

पाम चुना भट्टी जवळ हि घटना घडलेली असून या अपघातात नरेंद्र बारी (वय 45 वर्ष ) व भूपेश बारी (वय 34 वर्ष ) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नरेंद्र बारी हे तारापुर औद्योगिक मधील अनुह फार्मा कंपनी तर भूपेश बारी हे जीएम सिंथेटिक कंपनीत काम करीत होते रविवारी संध्याकाळी 7 वाजता कामावरुन घरी जात असताना पाम गावाजवळ नांदगाव समुद्रकिनाऱ्यावरून बोईसर कडे येणाऱ्या भरधाव कार नंबर एम.एच.48 ए. के 796 कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली ती धडक इतकी जोरदार होती की यामध्ये दुचाकी चालवणारा नरेंद्र बारी यांचा जागीच मृत्यु झाला तर भूपेश बारी यांचा तुंगा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला आहे.

सदर प्रकरणी पोलीसांनी ओम प्रकाश पाटील वय 23 वर्ष व आशितोष मारुती कानेरे वय 24 वर्ष यांच्यावर 304, 279, 337, 338, 34 मोटार वाहन कायदा 1988 नुसार कलम 185 गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी