जनसंवाद अभियानातुन दरोडाच्या तयारीत असलेल्या आरोपींना पकडण्यात मनोर पोलीसांना आले यश

जनसंवाद अभियानातुन दरोडाच्या तयारीत असलेल्या आरोपींना पकडण्यात मनोर पोलीसांना आले यश

पालघर : बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतुन जनसंवाद अभियानातुन पुन्हा एकदा गुंह्याची उकल करण्यात यश आले असुन मनोर पोलीस ठाणे हद्दीतील दरोड्याच्या तयारीत असण्याऱ्या आरोपींना मनोर पोलीसांनी पकडुन कारवाई करण्यात आली आहे.

बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी सुरु केलेल्या जनसंवाद अभियानातर्गत प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक गांव एक अंमलदार ही योजना राबवण्यात येत आहे. अश्याच गोवाडे या गावाकरिता पोलीस अंमलदार पोना / 1123 राजु सुकऱ्या भोईर यांची नेमणुक केलेली होती. दिनांक 16/05/2023 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास एका सतर्क ग्रामस्थाने मनोर पोलीस ठाणे येथे फोन करुन कळविले की, मौजे गोवाडे गावचे हद्दीमध्ये रोहित जीवन संखे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या पेट्रोल पंपा जवळील शेतामध्ये काही संशयीत इसम दबा धरुन बसले आहेत. त्यामाहितीनुसार मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. उमेश पाटील, सपोनि केशव राठोड हे पथकासह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले पोलीसांना पाहताच तेथे दबा धरुन बसलेले संशयित एकुण 06 इसम हे पोलीसांना पाहुन पळून जात असताना पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन 04 आरोपींना पकडण्यात यश आले आहे यात सदर आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आपसात संगनमत करुन सामाईक ईरादयाने घातक शस्त्र स्वतःकडे बाळगुन पेट्रोल पंप अथवा मनोर, पालघर रोडने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांवर दरोडा घालण्यासाठी एकत्र जमुन दरोडाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना मिळून आले म्हणून मनोर पोलीस ठाणे येथे गु. र. क्र 141/2023 भादविसं कलम प्रमाणे 399 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून  04 आरोपींना अटक असून त्यांना दिनांक 19 /05/2023 रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे.
तसेच यावेळी आरोपीन कडे एकूण 5230/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला असून त्यात 1) दोन लोखंडी फोडिंगचे चाकू 2) एक विटकरी रंगाची लाकडी मुठ असलेली लोखंडी एअर पिस्टल 3) एक निळ्या रंगाची प्लास्टिकची मुठ असलेली लोखंडी पकड 4) एक पिवळसर रंगाची एक मुठ असलेला मोठा स्क्रू ड्रायव्हर 5) एक निळ्या रंगाचा व एक नारंगी रंगाचा असे दोन नायलॉन दोरीचे बंडल 6) 20 सफेद रंगाचे प्लास्टिक हातमोजे ( हैंडग्लोज ) 7) दोन सफेद रंगाचे उपकरण (कपडा ) 8) 4 रंगीबेरंगी लेडीज स्कार्फ 9) दोन खाकी रंगाचे बॉक्स पैकिंग टेप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर, नीता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील पोलीस निरीक्षक मनोर पोलीस ठाणे, सपोनि केशव राठोड, मनोर पोलीस ठाणे व मनोर पोलीस ठाणे कडील पोलीस पथक यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी