Posts

Showing posts from February, 2023

पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरींचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश

Image
  पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरींचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश   पालघर _पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरींचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन तारापूर एमआयडीसीमधील एका कारखान्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन चोरांना पकड्ल्यावर त्यांच्या चौकशीतून हे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. सदर चोर  शहापूर आणि जव्हार तालुक्याच्या दुर्गम भागात राहणार्‍या या चोरानी केवळ मौजमजेसाठी झटपट पैसा हवा म्हणून दुचाकी चोरीचा गोरखधंदा सुरू केला होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागातच विकण्याची ते काळजी घेत होते.मात्र एका कंपनीवर दरोडा टाकण्याची हाव चोरांना महागात पडली असून यामुळे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यास पालघर पोलिसांना यश आले आहे.  पालघर जिल्ह्यात मागील व चालु वर्षात वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते व या गुन्ह्यांतील आरोपीत निष्पन्न नव्हते त्यामुळे सदर बाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाठ अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल विभुते, पोली...

भरधाव ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Image
भरधाव ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू पालघर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना एका महाविद्यालयीन हंसी मुकेश सिसोदिया (वय १८ वर्ष) या तरुणीचा भरधाव ट्रेनने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. २२ फेब्रुवारी 2023 रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असुन हंसी ही विरार मधील यशवंत कुंज परिसरातील रहिवाशी असून ती पालघर येथील सेंट जॉन महाविद्यालयात शिक्षण घेत होती बुधवारी नेहमीप्रमाणे ती घरातून कॉलेजला निघाली यावेळी हंसीने बोरिवली वलसाड मेमोतून  प्रवास केला. त्यानंतर हंसी पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर उतरली. रेल्वे ट्रॅक ओलांडून हंसी महाविद्यालयाकडे जात असताना, अचानक भरधाव वेगाने तेजस एक्सप्रेस आली. काही कळण्याच्या आतच ट्रेनने हंसीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये हंसी गंभीर जखमी झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने हंसीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्य...

एक दारूच्या खंबा सहित दोन वनपाल एसीबीच्या ताब्यात

Image
  एक दारूच्या खंबा सहित दोन वनपाल एसीबीच्या ताब्यात पालघर : वाडा तालुक्यातील वनपाल 1) विजय लक्ष्मण धुरी, वय-53 वर्ष, वनपाल नेहरोली परिमंडळ ता. वाडा, (वर्ग 3), 2) विष्णु पोपट सांगळे, वय 55 वर्ष, बाणगंगा परिमंडळ ता. वाडा ( वर्ग 3) यांनी तक्रारदार यांच्या कडून 10,000/-रु व एक दारूचा खंबा लाच मांगणी करुन स्वीकारताना एंटी करप्शन ब्यूरो पालघर विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर तक्रारदार हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे मॅनेजर म्हणुन काम करत असुन त्यांना एन. ए. करिता नाहरकत दाखल्यासाठी वाडा वनविभाग यांच्या पंचनाम्याची गरज असुन त्यासाठी त्यांचे एक काम प्रलंबित होते. सदर प्रकरणात पंचनामा करण्याच्या मोबदल्यात विजय धुरी यांनी रु. 10000/- रु व एक राॅयल स्टॅग दारूचा खंबा याची तक्रारदार यांचेकडून लाचेची मागणी करुन दारुचा खंबा तात्काळ आणुन देण्यास सांगितले व सदर लाचेच्या मागणीस विष्णु सांगळे यांनी प्रोत्साहन दिले त्यावरुन लाचेचा सापळा आजमाविला असता विजय धुरी यांनी वनविभाग वाडा येथील शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा (किंमत 760/- रु) स्विकारला असता विजय धुरी व विष्णु सांगळे यांना दि. 21/02/2023 ...

पाम ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांना हळदकुंकू लावून सन्मानित

Image
पाम ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांना हळदकुंकू लावून सन्मानित ग्रामपंचायतीकडून आयोजित कार्यक्रमात चारशे महिलांचा सहभाग बोईसर : दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी पाम ग्रामपंचायतीकडून महिलांना हळदकुंकू लावून सन्मानित करण्यात आले. पाम गावातील क्रिकेट मैदानावर भव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळजवळ ४०० महिलांनी  सहभाग घेतला . भारतीय संस्कृतिचा एक अविभाज्य घटक, कुटुंबातील खऱ्या अर्थाने सत्कार मूर्ति व त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर एक आगळवेगळ अस्तित्व निर्माण केलेल्या महिलाचा सत्कार होणे या सामाजिक बांधिलकीच्या भावनेने पाम ग्रामपंचायतीने महिलासाठी एक अभिनव असा हळदकुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला.यात दुधात साखर घालून कार्यक्रम गोड व्हावा या उद्देशाने पाम कुंभवली विभाग हायस्कुल पाम टेभी येथील विद्यार्थीने शिक्षक सचिन संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अश्या वादवृधाच्या माधुर्य आवाजामध्ये स्वागत व सलामी देऊन लेझीम नृत्याच्या विहंगत दृश्यामध्ये सर्व उपस्थित महिलाना पाम ग्रामपंचायत कार्यालय ते क्रिकेट मैदान कार्यक्रमस्थळी घेऊन आले. यानंतर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली स...

नवापूर गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

Image
नवापूर गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन  बोईसर: दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी नवापुर गावात पालघर पंचायत समिती चे उपसभापती व नवापूर पंचायत समिती गण सदस्य मिलिंद वडे यांच्या शुभहस्ते नवापूर गावात खेळाच्या मैदानावर खुले सभागृहाचे  तसेच शेटे स्टॉप येथील जुन्या पाण्याच्या टाकीचे दुरूस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नवापूर गावाचे सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे व रोहित बारी ,विजय बारी, हनेश बारी ,करण बारी, ग्रामपंचायत सदस्य,आणि  ग्रामस्थ उपस्थित होते.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना नमो नमो मोर्चा भारत तर्फे वाहिली श्रद्धांजलि

Image
पुलवामा   दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना नमो नमो मोर्चा भारत तर्फे वाहिली श्रद्धांजलि  बोईसर : जम्मू काश्मीर येथे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला आज ४ वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांना आज देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच जगभरात 14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जात असताना भारतात मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जात आहे. याच दिवशी २०१९ मध्ये जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात तब्बल ४० जवान शहीद झाले होते. यामुळे देशभरात या निमित्त श्रद्धांजली पर कार्यक्रम होत असून शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते. असाच एक कार्यक्रम नमो नमो मोर्चा भारत तर्फे धोड़ीपूजा, बोईसर येथील जनसंपर्क कार्यलयात भारत मातेच्या या सुपुत्रांना दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नमो नमो भारत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह यांनी सांगितले की, पुलवामा हल्ल्याचे हे भीषण दृश्य कधीच विसरता येणार नाही आणि कधीही विसरणार नाही.त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला आम्ही कधीही विसरु शकत...

बोईसर मध्ये एनआयएची कारवाई, एका तरुणाला चौकशीसाठी घेतले ताब्यात

Image
  बोईसर मध्ये एनआयएची कारवाई, एका तरुणाला चौकशीसाठी घेतले ताब्यात  बोईसर :- पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील आयएसआयएस आणि अल कायद्याच्या  संपर्कात असल्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित संशयिताला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने (NIA) चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमराज शेख असे त्याचे नाव आहे. बोईसर पश्चिमेतील एका सोसायटीतून या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या या तरूणाची एनआयएकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून एनआयएकडून बोईसरमध्ये गुप्त पद्धतीने चौकशी सुरू असून आता या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा संशयित तरुण कुवेत, सौदी अरेबियासह केरळ या ठिकाणी मागील काही काळापासून राहत असून मागील दोन महिन्यांपूर्वीच तो बोईसरमध्ये राहण्यास आला होता. या प्रकरणात स्थानिक पोलिसांकडूनही काही माहिती हाती लागली नसली तरी मागील काही दिवसांपूर्वी बेंगळुरू आणि मुंबईत एनआयएने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत...

घरफोडीच्या ५ गुन्ह्यांतील २ अट्टल चोरांना पकड़ण्यात बोईसर पोलीसांना आले यश

Image
घरफोडीच्या ५ गुन्ह्यांतील २ अट्टल चोरांना पकड़ण्यात बोईसर पोलीसांना आले यश  बोईसर : बोईसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुट्टीच्या दिवशी बरेच नागरिक परिवारासह बाहेर गावी फिरायला जात असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. बोईसर पोलिस ठाण्यात घरफोडी करून चोरीचे ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. घरफोडी झालेल्या भागातील सी सी टी वी फुटेज पडताळून पाहिले असता चोरी करणारे चोर एक सारखे दिसत असल्याचे निदर्शनास आले असता पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी यांच्यासह पो हवा विजय दुबळा, संतोष वाकचौरे पो ना. संदीप सोनावणे, योगेश गावित, सुरेश दुसाने, देवेंद्र पाटील, धिरज साळुंके , मच्छिंद्र घुगे आणि मयुर पाटील यांच्या पथकाने बोईसर परिसरात शनिवार आणि रविवारी विशेष गस्त घालत आरोपींचा शोध सुरू केला होता. ५ फेब्रुवारीला बोईसर रेल्वे स्थानक परिसरात पो हवा संतोष वाकचौरे आपला गणवेश परिधान न करता साध्या वेशात गस्...

कैलेक्स कंपनीच्या विरोधात पाम ग्रामस्थ आक्रमक; ग्रामसभेत ठराव संमत !

Image
 कैलेक्स कंपनीच्या विरोधात पाम ग्रामस्थ आक्रमक; ग्रामसभेत ठराव संमत ! वेळप्रसंगी काढणार मोठा मोर्चा - मनोज पिंपळे बोईसर: दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामपंचायत पाम  गावदेवी विसावा शेड  येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रामसभेत गावातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सचिव यांनी अध्यक्षांचा परवानगीने आलेल्या अर्जाचे वाचन करण्यात आले  बऱ्याच वर्षांनंतर ग्रामसभेत गावातील लोकांनी सहभाग घेऊन ग्रामसभेत शांत राहण्याचे पसंत करत सर्व विषय शांत पूर्ण सुरू असताना मात्र  सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे उपसरपंच मनोज पिंपळे यांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे कैलेक्स केमिकल लिमिटेड कंपनीवर कारवाई करण्याचा. प्राप्त अर्जावर मिळालेल्या माहितीनुसार सदर कंपनी बेकायदेशीर बांधकाम करुन कारखान्याची हद्द वाढविली असुन बेकायदेशीर रित्या केमिकल साठा तसेच बेकायशीर रित्या प्लॉट नंबर N- 102,90,91 ह्या कंपनी मध्ये अनधिकृत पणे केमिकल तयार करुन त्याचा साठा M-4, 15 येथे बेकायदेशीर रित्या करित आहे.त्यामुळे या कंपनी वर कारवाई करण्यात यावी....

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदन संखे यांच्या वतीने बोईसर येथे विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण*

Image
  *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदन संखे यांच्या वतीने बोईसर येथे विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण* बोईसर : दि.9 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघर जिह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व निर्धार सेवा संस्थेचे अध्यक्ष  कुंदन संखे यांच्या माध्यमातून व संकल्पनेतून बनविल्या गेलेल्या विसावा शेड  व वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण  पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या हस्ते बोईसर येथील विजय कॉलनी टीएपीएस कॉलनी, पास्थळ येथे करण्यात आले. या विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचा वापर बोईसर चित्रालय परिसरात सर्व लोकांना होणार असुन अशा प्रकारची वास्तू उभी राहिल्याने यांचा वापर महिला, ज्येष्ठ नागरिक , तरुणवर्ग यांना निवांत बसून वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध बाबी समजणार तर आहेच परंतु त्यासोबत ज्या नागरिकांच्या घरात अपुऱ्या जागेमुळे अभ्यास होत नाही अशा विद्यार्थ्यांनाही रात्रीच्या उजेडात या विसावा शेड मध्ये निवांत अभ्यास करता येईल अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त के...

मान ग्रामपंचायत सदस्यासह एक खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात

Image
  मान ग्रामपंचायत सदस्यासह एक खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात बोईसर : पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायत सदस्य अजय सुरेश शिणवार ( वय 27 वर्ष ) व विक्रांत राजेंद्र चुरी ( वय 29 वर्ष ) खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवाना मिळविण्याकरीता तक्रारदार यांच्या ओळखीच्या दोन इसमाला ग्रामपंचायत कार्यालय मान यांच्या कडून नाहरकत दाखल्यासाठी मोबदला म्हणून एका नाहरकत दाखल्याचे एकूण 25,000/- रूपये याप्रमाणे दोन दाखल्याचे एकूण 50,000/- रूपये लाचेच्या रक्कमेची अजय शिणवार यांनी मांगणी केली होती व विक्रांत चुरी यांनी लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहित केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्यावरुन लाचेचा सापळा रचून एका नाहरकत दाखल्याचा मोबदला म्हणून 25,000/- रूपये दि.08/02/2023 रोजी 13.14 वा.अजय शिणवार यांना त्यांच्या अजय बियर शॉप, शॉप नं. 2046, बोईसर चिल्हार रोड, वारांगडे, येथे 25000/- रूपये लाचेची रक्कम  स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असुन विक्रांत चुरी यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध क...

पाम गावातील गावदेवीचे मंदिर होणार भव्य व सुशोभित

Image
पाम गावातील गावदेवीचे मंदिर होणार भव्य व सुशोभित  पालघर : पालघर तालुक्यातील तारापुर एमआयडीसी लगत असलेल्या पाम गावात विविध समाज जातीचे लोक फार वर्षापासून गुण्यागोविंदाने राहत असुन परिसरात आदर्श गाव अशी या पाम गावची ओळख आहे. सर्व गावात गावदेवी मंदिर हे असतेच जे संपूर्ण गावाला सुखी व समृद्धि जीवन देऊन ग्रामस्थाचे रक्षण करते. अशीच पाम गावाची ग्रामदेवता ही प्राचीन काळापासून एक जागृत देवता आहे. जि पाम गावाच्या प्रवेश दारावर गावदेवी मंदिर वडाच्या झाडाखाली पूर्वीपार आहे तसेच या देवीची दररोज पूजा केली जाते व गावातील ग्रामस्थ गावात येताना किव्हा बाहेर जाताना नमस्कार करून देवीचे आशीर्वाद घेतात .तसेच कोणतेही शुभकार्य करताना या देवीची पूजा करून कार्य पूर्ण केले जाते. परंतु गावदेवीचे मंदिर हे छोटे व अडचणीचे असुन काळानुसार गावदेवी मंदिराचे जीर्णोद्धार झाले पाहिजे असे पाम गावाच्या ग्रामस्थाने ठरविले असुन यासाठी ग्रामस्थानी अनेक वेळा सभेचे आयोजन करून त्यामध्ये चर्चा व विचारविनिमय करून मंदिर जीर्णोद्धार करण्याचे ठरविले आहे.त्यासाठी गावदेवी मंदिर मंडळ पामची अधिकृत स्थापना करण्यात आली. यासाठी सर्वांच्...