घरफोडीच्या ५ गुन्ह्यांतील २ अट्टल चोरांना पकड़ण्यात बोईसर पोलीसांना आले यश
घरफोडीच्या ५ गुन्ह्यांतील २ अट्टल चोरांना पकड़ण्यात बोईसर पोलीसांना आले यश
बोईसर : बोईसर आणि आजूबाजूच्या परिसरात सुट्टीच्या दिवशी बरेच नागरिक परिवारासह बाहेर गावी फिरायला जात असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. बोईसर पोलिस ठाण्यात घरफोडी करून चोरीचे ५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. घरफोडी झालेल्या भागातील सी सी टी वी फुटेज पडताळून पाहिले असता चोरी करणारे चोर एक सारखे दिसत असल्याचे निदर्शनास आले असता पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी यांच्यासह पो हवा विजय दुबळा, संतोष वाकचौरे पो ना. संदीप सोनावणे, योगेश गावित, सुरेश दुसाने, देवेंद्र पाटील, धिरज साळुंके , मच्छिंद्र घुगे आणि मयुर पाटील यांच्या पथकाने बोईसर परिसरात शनिवार आणि रविवारी विशेष गस्त घालत आरोपींचा शोध सुरू केला होता. ५ फेब्रुवारीला बोईसर रेल्वे स्थानक परिसरात पो हवा संतोष वाकचौरे आपला गणवेश परिधान न करता साध्या वेशात गस्त घालत असताना सी सी टी वी फुटेज मधील संशयित आरोपी बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वाकचौरे यांनी सदर आरोपीस चौकशी करण्यासाठी थांबवले असता आरोपीने उलट पलटवार करत वाकचौरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दुसरा आरोपी पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला वाकचौरे यांनी तात्काळ पो उपनिरीक्षक शरद सुरळकर यांना फोन द्वारे कळवत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी यांच्यासह संपूर्ण गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सदर दोन्ही चोरट्यांना मोठ्या शिताफीने गजाआड केले. तर दुसऱ्या चोराला पालघर रेल्वे स्थानकावरुन गजाआड करण्यात आले.यात अतिश दत्ताराम साखरकर वय ३६ वर्षे रा. फुलपाडा विरार आणि राहुल गिरीश राठोड वय ३८ वर्षे रा. वडकून डहाणू अशी या दोन अट्टल चोरांची नावे असुन अश्या या दोन अट्टल गुन्हेगारांना गजाआड करण्यात बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या चोरट्यांकडून ५,९२,००० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment