पाम ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांना हळदकुंकू लावून सन्मानित
पाम ग्रामपंचायतीकडून विधवा महिलांना हळदकुंकू लावून सन्मानित
ग्रामपंचायतीकडून आयोजित कार्यक्रमात चारशे महिलांचा सहभाग
बोईसर : दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी पाम ग्रामपंचायतीकडून महिलांना हळदकुंकू लावून सन्मानित करण्यात आले. पाम गावातील क्रिकेट मैदानावर भव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळजवळ ४०० महिलांनी सहभाग घेतला .
भारतीय संस्कृतिचा एक अविभाज्य घटक, कुटुंबातील खऱ्या अर्थाने सत्कार मूर्ति व त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर एक आगळवेगळ अस्तित्व निर्माण केलेल्या महिलाचा सत्कार होणे या सामाजिक बांधिलकीच्या भावनेने पाम ग्रामपंचायतीने महिलासाठी एक अभिनव असा हळदकुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला.यात दुधात साखर घालून कार्यक्रम गोड व्हावा या उद्देशाने पाम कुंभवली विभाग हायस्कुल पाम टेभी येथील विद्यार्थीने शिक्षक सचिन संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अश्या वादवृधाच्या माधुर्य आवाजामध्ये स्वागत व सलामी देऊन लेझीम नृत्याच्या विहंगत दृश्यामध्ये सर्व उपस्थित महिलाना पाम ग्रामपंचायत कार्यालय ते क्रिकेट मैदान कार्यक्रमस्थळी घेऊन आले.
यानंतर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला थेट सरपंच दर्शना पिंपळे, पालघर पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा पिंपळे, ग्रामसेवक अल्पना पाटील , माजी सरपंच लक्ष्मी पिंपळे, ज्येष्ठ नागरिक आशालता वडे यांच्या कडून हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.
सरपंच दर्शना पिंपळे यांच्या कडून विधवा महिलाना प्रथम हळदीकुंकू करण्यात आले आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले सदर कार्यक्रमात सर्व आळीतुन महिलांनी नाटक, ऊखाणे, डांन्स घेण्यात आले होते.तसेच वंजारी समाजातील लग्नात नवरी ला लावणारी हळदीत कश्या प्रकारे वंजारी भाषेत गाणे बोलुन नाचले जाते यांचे नाटक व लहान मुलांच्या सटीचे(बारश्याचे) वंजारी भाषेतील नाटक उत्तम प्रकारे करण्यात आले यातून वंजारी समाजाची संस्कृती दिसून आली यात काही महिलांनी वैयक्तिक डांन्स व सामूहिक डांन्स घेण्यात आले होते यात सहभाग घेण्याऱ्या सर्व महिलांना पाम ग्रामपंचायत तर्फे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या कडून सन्मान चिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्र नियोजनबद्ध पार पाडण्यात ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री मनोज पिंपळे सदस्य मनीष जाधव, मनीष संखे रोहित पाटील, कल्पेश संख्ये ,श्वेता संखे, पूजा वडे, वैभवी पिंपळे, भारती राऊत, भारती पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृतिक राउत यांनी केले व सदर कार्यक्रम मनोरंजनात व जल्लोषात पार पडला. तसेच लूपिन ह्युमन वेल्फेअर एंड रिसर्च तारापूर, फाउंडेशन तर्फे महिलांन साठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
सर्वांनी उत्तम प्रतिसाद देऊन कार्यक्रमात सहभाग घेतल्या बाबत आभार व्यक्त करत यापुढे देखील असेच वेगवेगळे उपक्रम आयोजित करू असे सरपंच दर्शना पिंपळे यांनी सांगितले
बऱ्याच वर्षानंतर अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत महिलांना हळदकुंकू लावून सन्मानित करण्यात आल्या बाबत पाम गावातील महिलांकडून पाम ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment