पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना नमो नमो मोर्चा भारत तर्फे वाहिली श्रद्धांजलि
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना नमो नमो मोर्चा भारत तर्फे वाहिली श्रद्धांजलि
बोईसर : जम्मू काश्मीर येथे पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला आज ४ वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांना आज देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. तसेच जगभरात 14 फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जात असताना भारतात मात्र हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जात आहे. याच दिवशी २०१९ मध्ये जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात तब्बल ४० जवान शहीद झाले होते. यामुळे देशभरात या निमित्त श्रद्धांजली पर कार्यक्रम होत असून शहीद जवानांना आदरांजली वाहिली जाते.
असाच एक कार्यक्रम नमो नमो मोर्चा भारत तर्फे धोड़ीपूजा, बोईसर येथील जनसंपर्क कार्यलयात भारत मातेच्या या सुपुत्रांना दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नमो नमो भारत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह यांनी सांगितले की, पुलवामा हल्ल्याचे हे भीषण दृश्य कधीच विसरता येणार नाही आणि कधीही विसरणार नाही.त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला आम्ही कधीही विसरु शकत नाही. अशा दु:खद प्रसंगाचे स्मरण करून आयोजित केलेल्या सभेला उपस्थित सर्वांनी शहीद जवानांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी माजी सैनिक जगदीश प्रसाद आणि भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त अग्निशमन अधिकारी एस एस तिवारी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित होते, तसेच नमो नमो मोर्चा भारत पालघर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष विजयशंकर तिवारी, जिल्हा महिला संगठन महामंत्री शोभा श्रीवास्तव, जिल्हा युवा अध्यक्ष अखिलेश चौबे, संगीता सिंग, उषा सिंग, जिल्हा युवा संघटन महामंत्री मनीष श्रीवास्तव, जिल्हा युवा विधी सलाहकार सौरव पांडे, जिल्हा युवा महामंत्री मोनू शर्मा, राजू यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment