मान ग्रामपंचायत सदस्यासह एक खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात

 मान ग्रामपंचायत सदस्यासह एक खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात


बोईसर : पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायत सदस्य अजय सुरेश शिणवार ( वय 27 वर्ष ) व विक्रांत राजेंद्र चुरी ( वय 29 वर्ष ) खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवाना मिळविण्याकरीता तक्रारदार यांच्या ओळखीच्या दोन इसमाला ग्रामपंचायत कार्यालय मान यांच्या कडून नाहरकत दाखल्यासाठी मोबदला म्हणून एका नाहरकत दाखल्याचे एकूण 25,000/- रूपये याप्रमाणे दोन दाखल्याचे एकूण 50,000/- रूपये लाचेच्या रक्कमेची अजय शिणवार यांनी मांगणी केली होती व विक्रांत चुरी यांनी लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहित केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्यावरुन लाचेचा सापळा रचून एका नाहरकत दाखल्याचा मोबदला म्हणून 25,000/- रूपये दि.08/02/2023 रोजी 13.14 वा.अजय शिणवार यांना त्यांच्या अजय बियर शॉप, शॉप नं. 2046, बोईसर चिल्हार रोड, वारांगडे, येथे 25000/- रूपये लाचेची रक्कम  स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असुन विक्रांत चुरी यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाई सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. ठाणे परिश्रेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिश्रेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ जगताप, पोलीस उपअधीक्षक, स्वपन बिश्वास, पोलीस निरीक्षक, पोहवा -अमित चव्हाण, विलास भोये, संजय सुतार, निशा मांजरेकर, दिपक सुमडा, योगेश धारणे, पोना - सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकाने केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी