पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरींचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश

 पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरींचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आले यश  

पालघर _पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरींचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन तारापूर एमआयडीसीमधील एका कारखान्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन चोरांना पकड्ल्यावर त्यांच्या चौकशीतून हे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. सदर चोर  शहापूर आणि जव्हार तालुक्याच्या दुर्गम भागात राहणार्‍या या चोरानी केवळ मौजमजेसाठी झटपट पैसा हवा म्हणून दुचाकी चोरीचा गोरखधंदा सुरू केला होता. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागातच विकण्याची ते काळजी घेत होते.मात्र एका कंपनीवर दरोडा टाकण्याची हाव चोरांना महागात पडली असून यामुळे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यास पालघर पोलिसांना यश आले आहे.

 पालघर जिल्ह्यात मागील व चालु वर्षात वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते व या गुन्ह्यांतील आरोपीत निष्पन्न नव्हते त्यामुळे सदर बाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाठ अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सदर गुन्ह्यांतील आरोपीतांचा शोध घेवुन तात्काळ अटक करण्याचे निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी पोउपनि - सागर पाटील, गणपत सुळे व स्वप्निल सावंतदेसाई यांची वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.

सदर पथकातील पोउपनि / सागर पाटील, यांच्या पथकाने दि. 20/02/2023 रोजी स्टाफसह बोईसर एमआयडीसी परिसरात गुन्हे वॉच पेट्रोलिंग करीत असताना रात्री 01.20 वा.चे सुमारास कैमलिन नाका ते नवमी हॉटेल जाणाऱ्या रोडवर काही इसम बिगर नंबर प्लेटच्या दोन मोटार सायकलसह संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे आढळून आल्याने त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागल्याने त्यांना सोबतच्या अंमलदारानी 1) राम सखाराम काकड वय 19 वर्ष रा.मु.वांद्रे, पो - पिपळी, ता-शहापुर, जि- ठाणे, 2) गुरुनाथ पांडुरंग झुगरे, वय 20 वर्ष रा. मु बोटोशी बेलपाडा ता. मोखाडा, जि. पालघर 3) नितेश संजय मोडक वय 22 वर्ष रा.मु. वाघेची वाडी, पो. झाप, ता. जव्हार, जि. पालघर या तीन इसमांना ताब्यात घेवुन त्यांची कसून तपासणी केली असता त्यांचेकडील बैगमध्ये धारदार कोयता, लोखंडी  कटावणी, मिरची पुड, दोरी, कटर, स्क्रू ड्रायव्हर असे हत्यारे मिळून आले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता ते बोईसर एमआयडीसी मधील फास्ट टेकइंजिनिअर्स प्रा.लि प्लॉट नंबर ए-22 कंपनीचे मागील बाजुचे कंपाउंड भिंतीवरून आत प्रवेश करुन कंपनीतील सीसीटीव्ही वायर कट करून वॉचमन यास दोरीने बांधून कंपनीतील तांब्याचे धातुचे साहित्य दरोडा टाकून चोरी करण्यासाठी आल्याचे सांगितले.त्यामुळे त्यांचेविरुद्ध बोईसर ठाणे येथे ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील नमूद अटक आरोपी यांची पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदार आरोपीसह पालघर, ठाणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरातून अनेक मोटार सायकली चोरी करुन त्या जव्हार, शहापुर परिसरात विक्री केल्याचे निष्पन्न झाले असुन अटक आरोपीकडून चोरी केलेल्या एकूण 19,60,000/- रूपये किंमतीच्या 38 मोटार ताब्यात घेण्यात आल्या आहे.

सदर मोटार सायकलचे इंजिन नंबर व चेसिस नंबरच्या आधारे मुळ मालकांचा शोध घेऊन अधिक तपास पोउपनि/ सागर पाटील, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा हे करीत आहेत. यात नमूद आरोपींनवर अलगअलग 25 पोलीस ठाण्यातील रजि. गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर,  शैलेश काळे, पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर, अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि / सागर पाटील, भरतेश हारूगिरे, पोहवा - दिपक राउत, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, कपिल नेमाडे, नरेंद्र पाटील, हिरामण खोटरे, संदीप सरदार, पोशि - नरेश घाटाळ सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी