एक दारूच्या खंबा सहित दोन वनपाल एसीबीच्या ताब्यात
एक दारूच्या खंबा सहित दोन वनपाल एसीबीच्या ताब्यात
पालघर : वाडा तालुक्यातील वनपाल 1) विजय लक्ष्मण धुरी, वय-53 वर्ष, वनपाल नेहरोली परिमंडळ ता. वाडा, (वर्ग 3), 2) विष्णु पोपट सांगळे, वय 55 वर्ष, बाणगंगा परिमंडळ ता. वाडा ( वर्ग 3) यांनी तक्रारदार यांच्या कडून 10,000/-रु व एक दारूचा खंबा लाच मांगणी करुन स्वीकारताना एंटी करप्शन ब्यूरो पालघर विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर तक्रारदार हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे मॅनेजर म्हणुन काम करत असुन त्यांना एन. ए. करिता नाहरकत दाखल्यासाठी वाडा वनविभाग यांच्या पंचनाम्याची गरज असुन त्यासाठी त्यांचे एक काम प्रलंबित होते. सदर प्रकरणात पंचनामा करण्याच्या मोबदल्यात विजय धुरी यांनी रु. 10000/- रु व एक राॅयल स्टॅग दारूचा खंबा याची तक्रारदार यांचेकडून लाचेची मागणी करुन दारुचा खंबा तात्काळ आणुन देण्यास सांगितले व सदर लाचेच्या मागणीस विष्णु सांगळे यांनी प्रोत्साहन दिले त्यावरुन लाचेचा सापळा आजमाविला असता विजय धुरी यांनी वनविभाग वाडा येथील शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा (किंमत 760/- रु) स्विकारला असता विजय धुरी व विष्णु सांगळे यांना दि. 21/02/2023 रोजी.15 :05 वा. रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन पुढील कारवाई चालू आहे.
सदर कारवाई सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. ठाणे परिश्रेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिश्रेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ जगताप, पोलीस उपअधीक्षक, पोहवा - अमित चव्हाण, विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दिपक सुमडा, पोना - स्वाती तारवी या पथकाने केली आहे.
Comments
Post a Comment