कैलेक्स कंपनीच्या विरोधात पाम ग्रामस्थ आक्रमक; ग्रामसभेत ठराव संमत !
कैलेक्स कंपनीच्या विरोधात पाम ग्रामस्थ आक्रमक; ग्रामसभेत ठराव संमत !
वेळप्रसंगी काढणार मोठा मोर्चा - मनोज पिंपळे
बोईसर: दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामपंचायत पाम गावदेवी विसावा शेड येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर ग्रामसभेत गावातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सचिव यांनी अध्यक्षांचा परवानगीने आलेल्या अर्जाचे वाचन करण्यात आले बऱ्याच वर्षांनंतर ग्रामसभेत गावातील लोकांनी सहभाग घेऊन ग्रामसभेत शांत राहण्याचे पसंत करत सर्व विषय शांत पूर्ण सुरू असताना मात्र सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे उपसरपंच मनोज पिंपळे यांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे कैलेक्स केमिकल लिमिटेड कंपनीवर कारवाई करण्याचा. प्राप्त अर्जावर मिळालेल्या माहितीनुसार सदर कंपनी बेकायदेशीर बांधकाम करुन कारखान्याची हद्द वाढविली असुन बेकायदेशीर रित्या केमिकल साठा तसेच बेकायशीर रित्या प्लॉट नंबर N- 102,90,91 ह्या कंपनी मध्ये अनधिकृत पणे केमिकल तयार करुन त्याचा साठा M-4, 15 येथे बेकायदेशीर रित्या करित आहे.त्यामुळे या कंपनी वर कारवाई करण्यात यावी. तसेच उपसरपंच मनोज पिंपळे यांनी सांगितले की आम्ही या कंपनी वर कारवाई करण्यासाठी सर्व सबंधित कार्यालयात निवेदन देण्यात येईल संबंधित कार्यालयाकडून उचित कारवाई न झाल्यास ग्रामस्थांकडून कंपनीवर व संबंधित विभागाकडे मोठा मोर्चा काढण्यात येईल व एन जी टी लाही कारवाईसाठी प्रस्तावना पाठवण्यात येईल असे सांगितले.
Comments
Post a Comment