*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदन संखे यांच्या वतीने बोईसर येथे विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुंदन संखे यांच्या वतीने बोईसर येथे विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण*
बोईसर : दि.9 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघर जिह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व निर्धार सेवा संस्थेचे अध्यक्ष कुंदन संखे यांच्या माध्यमातून व संकल्पनेतून बनविल्या गेलेल्या विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या हस्ते बोईसर येथील विजय कॉलनी टीएपीएस कॉलनी, पास्थळ येथे करण्यात आले.
या विसावा शेड व वृत्तपत्र वाचनालयाचा वापर बोईसर चित्रालय परिसरात सर्व लोकांना होणार असुन अशा प्रकारची वास्तू उभी राहिल्याने यांचा वापर महिला, ज्येष्ठ नागरिक , तरुणवर्ग यांना निवांत बसून वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध बाबी समजणार तर आहेच परंतु त्यासोबत ज्या नागरिकांच्या घरात अपुऱ्या जागेमुळे अभ्यास होत नाही अशा विद्यार्थ्यांनाही रात्रीच्या उजेडात या विसावा शेड मध्ये निवांत अभ्यास करता येईल अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली .आमदार श्रीनिवास वनगा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे बोईसर मध्ये पहिल्यांदाच इतका स्तुत्य कार्यक्रम होत असून यामुळे परिसरातील नागरिकांना याचा निवांत लाभ घेता येईल असे सांगितले तर आपल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील राजकीय सामाजिक जीवनात सातत्यपूर्ण योगदान देणारे कुंदन संखे यांनी याहीपुढे जितकं शक्य आहे तिथे सामाजिक योगदान देण्याचा प्रयत्न असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नागरिकांकरिता महत्त्वाची असलेली बाब उपलब्ध करून देऊ शकलो याचे समाधान असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रमात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व गटप्रमुख वैदही वाढाण , माजी जिल्हाध्यक्षा ज्योती मेहेर, जिल्हा परिषद सदस्य मंगेश भोईर , पंचायत समिती सदस्य श्वेता देसले , पास्थळ ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश घरत , विशाल जाधव, राणी रावते ,कुंभवली गावाच्या सरपंच तृप्ति संखे ,उपसरपंच अमित संखे , सदस्य सोनाली संखे, आकाश संखे राहुल संखे , जेष्ठ कार्यकर्ते नागेश राऊळ, राजेंद्र मेस्त्री ,सामाजिक कार्यकर्ते सुनील इभाड,उल्हास पाध्ये, वैभव नाईक, ज्येष्ठ नागरिक जयप्रकाश पाटील , शंकर शेट्टी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार निनाद घरत यांनी केले.
Comments
Post a Comment