पाम गावातील गावदेवीचे मंदिर होणार भव्य व सुशोभित
पाम गावातील गावदेवीचे मंदिर होणार भव्य व सुशोभित
पालघर : पालघर तालुक्यातील तारापुर एमआयडीसी लगत असलेल्या पाम गावात विविध समाज जातीचे लोक फार वर्षापासून गुण्यागोविंदाने राहत असुन परिसरात आदर्श गाव अशी या पाम गावची ओळख आहे. सर्व गावात गावदेवी मंदिर हे असतेच जे संपूर्ण गावाला सुखी व समृद्धि जीवन देऊन ग्रामस्थाचे रक्षण करते. अशीच पाम गावाची ग्रामदेवता ही प्राचीन काळापासून एक जागृत देवता आहे. जि पाम गावाच्या प्रवेश दारावर गावदेवी मंदिर वडाच्या झाडाखाली पूर्वीपार आहे तसेच या देवीची दररोज पूजा केली जाते व गावातील ग्रामस्थ गावात येताना किव्हा बाहेर जाताना नमस्कार करून देवीचे आशीर्वाद घेतात .तसेच कोणतेही शुभकार्य करताना या देवीची पूजा करून कार्य पूर्ण केले जाते. परंतु गावदेवीचे मंदिर हे छोटे व अडचणीचे असुन काळानुसार गावदेवी मंदिराचे जीर्णोद्धार झाले पाहिजे असे पाम गावाच्या ग्रामस्थाने ठरविले असुन यासाठी ग्रामस्थानी अनेक वेळा सभेचे आयोजन करून त्यामध्ये चर्चा व विचारविनिमय करून मंदिर जीर्णोद्धार करण्याचे ठरविले आहे.त्यासाठी गावदेवी मंदिर मंडळ पामची अधिकृत स्थापना करण्यात आली.
यासाठी सर्वांच्या सहमतीने दि 25 जानेवारी 2023 रोजी माघी गणेशचतुर्थी च्या शुभदिनी ब्राह्मणाच्या सहाय्याने पूजा करून भूमिपूजन ग्रामस्थाच्या उपस्थितित करण्यात आले.
तसेच गावदेवी मंदिराचे जीर्णोद्धार करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबानी 500/- रूपये वर्गणी ठरवले असुन 3000/- पासून अधिक देणगी देणाऱ्याचे नावे देवळाच्या हॉल मध्ये बोर्डपटलावर कायम स्वरुपी लिहण्यात येईल तसेच मोठ्या रक्कमेच्या देणगीदारापासून प्रथम नावे बोर्डावर लिहून पुढे क्रमश: नावे लिहिली जातील व नविन मंदिरात गावदेवी व्यतीरिक्त अन्य देवीदेवतांचे फोटो / मूर्ति लावण्यात येणार नसल्याचे सर्वानुमते ठरले आहे.
सदर मंदिराच्या बांधकामास सुरवात झालेली असुन सर्व ग्रामस्थानी वर्गणी देऊन मंडळास सहकार्य करावे. असे अध्यक्ष-विनोद पद्माकर पिंपळे, कार्यकारिणी सदस्य / पदाधिकारी व सल्लागार, गावदेवी मंदिर मंडळ, पाम यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment