रेल्वेने प्रवास करण्याऱ्या प्रवासांचे मोबाईल,पॉकेट चोरी करणारा रेल्वे पोलीसांच्या ताब्यात
रेल्वेने प्रवास करण्याऱ्या प्रवासांचे मोबाईल,पॉकेट चोरी करणारा रेल्वे पोलीसांच्या ताब्यात रेकॉर्ड वरील आरोपीला पकडण्यात रेल्वे पोलीसांना आले यश पालघर : दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी आकाश रविंद्रनाथ दुबे (वय 29 वर्ष ) रा. मुलुंड हा पालघर स्टेशन वरून मुलुंड येथे जाण्याकरीता रेल्वेने प्रवास करीत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या पैन्टच्या खिशातील पॉकेट जबरीने काढून चोरुन नेल्याबाबत पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. त्याअनुषंगाने फिर्यादी आकाश दुबे यांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे व गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती घेऊन सदर गुन्हा करणारा आरोपी रोहित प्रकाश बिष्ट ( वय - 27 वर्ष ) रा. बोईसर याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणून त्यांच्याकड़े तपास केला असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून मा. न्यायालयात रिमांड कामी हजर करुन त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली नंतर बुद्धिकौशल्याने तपास केला असता त्याने पालघर रेल्वे पोलीस ठाणे रजिस्टर गुन्ह्यातील मोबाईल फोन चोरी केला असल्याचे सांगितले व त्याच्या राहत्या घरातून मोबाईल फोन हस्तगत करून मा. न्यायालय...