बोईसर पोलीसांनी गुटख्याची गाडी पकडून 12 लाख 74 हजार 440 रूपये चा मुद्देमाल केला जप्त

 बोईसर पोलीसांनी गुटख्याची गाडी पकडून 12 लाख 74 हजार 440 रूपये चा मुद्देमाल केला जप्त 

बोईसर : बोईसर एम.आय.डी.सी तील डी.सी कंपनी जवळ दिनांक 4/01/2023 रोजी  बुधवारी मध्यरात्री बोईसर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याने भरलेली इनोव्हा गाडी पकडण्यात आली असून एकूण 12 लाख 74 हजार 440 रूपये चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात गुटखा प्रतिबंधित असताना ही बेकायदा पद्धतीने आणून बोईसर शहरात विकण्याच काम चालु असून अशीच माहिती बोईसर पोलीसांना मिळताच डी.सी कंपनी जवळ इनोव्हा (गाडी नं. MH.48.A 8418) ही थांबवुन तपासणी केली असता त्यामध्ये 7 लाख 74 हजार 440 रूपये गुटखा व इनोव्हा गाडी 5 लाख असा एकूण 12 लाख 74 हजार 440 रूपये मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहन चालक पवन पाटील ( वालीव - वसई ) व मोहम्मद खालिद शेख ( रा. चित्रालय - बोईसर ) या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला