दंड न भरल्यास राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हजर राहावे लागणार
दंड न भरल्यास राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हजर राहावे लागणार
पालघर : राज्यात महाराष्ट्र शासनाच्या " वन स्टेट वन ई -चलान " एप्रिल 2019 पासून संपूर्ण पालघर जिल्ह्यात कार्यान्वित झालेला असुन वाहतुक नियत्रण शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक चालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील आजपर्यंत दंड न भरलेले वाहनचालक एकूण 35,073 असुन त्यांची दंडाची रक्कम 3,30,26,825/- रूपये इतकी खुप मोठ्या प्रमाणात असुन सदर ई-चलान प्रणाली द्वारे कारवाई करण्यात आलेल्या वाहनधारकांना एसएमएस द्वारे चलनाची तडजोड भरण्यासाठी सुचना देण्यात येतात. परंतु बऱ्याच वाहनधारकाने रकमेचा भरणा केलेला नाही.अश्या वाहन धारकांसाठी पुन्हा संधी देण्यासाठी मा. विधि व न्यायप्राधीकरण विभाग, पालघर यांचे मार्फत व मा. अपर पोलीस महासंचालक (वाहतुक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातुन संबधीत ई - चलान वाहन धारकांना एसएमएस संदेशाद्वारे / नोटीसीद्वारे कळविण्यात येत आहे की दि.10/02/2023 पर्यत तडजोड रकमेचा भरणा न केल्यास त्यांना प्राप्त एसएमएस संदेशाद्वारे संदेशाप्रमाणे दि.11/02/2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हजर राहावे लागणार आहे.जर तडजोड रकमेचा भरणा केल्यास लोकअदालतमध्ये हजर राहण्याची आवश्यकता नाही.
तडजोड रकमेचा भरणा या ठिकाणी करू शकता.
1) रोख रक्कम रोख स्वरूपात अथवा डेबीट कार्डद्वारे, क्रेडिट कार्डद्वारे, जिल्हा वाहतुक शाखा व चाररस्ता चौकी, पालघर स्टेशन चौकी, जिल्हा वाहतुक शाखा पालघर, पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे भरु शकता.
2) चलान केल्यास त्यानंतर समोरील व्यक्तिला त्यांचे मोबाईल एसएमएसद्वारे गेलेल्या संदेशमधील लिंक ओपन करुन अनपेड रक्कम भरता येते.
3) जवळचे पोलीस ठाणे अथवा वाहतुक अंमलदार यांचेकडे ई-चलान डिवाईसद्वारे अनपेड रक्कम भरु शकता.
तरी वरील प्रमाणे आपले वाहनावरील दंड हा दि. 11/02/2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालत पूर्वी भरावा. तसेच कोणाला या मुदतीत दंड भरणे शक्य नसेल त्यांनी यादिवशी होणाऱ्या लोकअदालमध्ये आपआपले जवळील कोर्टात दंड भरावा तसेच वाहनधारकांनी आपले वाहनावरील अनपेड दंड भरलेनंतर त्यांची रितसर पावती घ्यावी व आपले वाहनावरील दंड वसूल झाला आहे अगर कसे याची माहिती वाहतुक पोलीस अधिकारी अथवा पोलीस अंमलदार यांचेकडून घ्यावी. तरी वाहतुक नियमांचे पालन करून नागरीकांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पालघर व जिल्हा वाहतुक शाखा पालघर यांचेकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment