फसवणुक करुन लुटण्याऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
फसवणुक करुन लुटण्याऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
पालघर : सातिवली गावाच्या हद्दीत दिनांक 30/11/2022 रोजी फिर्यादी ने पोलीसांना सांगितल्या प्रमाणे सफाळा येथे जाण्यासाठी टेन नाका वर थांबले असता दोन इसम वय 40 ते 45 वर्ष सफाळा येथे कसे जायचे विचार पूस करत होते तेव्हा त्यांचे साथीदार अजुन दोन इसम तेथे कार घेऊन आले आणि फिर्यादीला म्हणाले आम्ही ही सफाळा येथे जात आहे तुम्ही पण आमच्या सोबत चला असे सांगितले त्यांनंतर फिर्यादी त्यांच्या कार मध्ये बसल्यानंतर प्रवासादरम्यान कार मधील दोन इसमांनी फिर्यादीस सांगीतले की पुढे एका बाईचा मर्डर झालेला असुन तिचे 70 लाख रूपये लुटुन नेलेले आहेत. त्यामुळे पोलीस चेकिंग सुरु आहे अशी फिर्यादीला खोटी बतावणी करून सोन्याचे दागिने काढून ठेवावे लागतील असे सांगितले व फिर्यादीने त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने त्यांनी दिलेल्या एका लिफाफयामध्ये ठेऊन दिल्यानंतर पुढे काही अंतर गेल्या नंतर फिर्यादीस एक लिफाफा देण्यात आला त्यात एक सफेद रंगाची मोबाईल चार्जिंगची वायर, एक कोणत्यातरी धातुचा तुकडा व शिश्याचा तुकडा देवून फिर्यादीची एकूण 3,24,000 /- रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने घेवून फसवणुक केली म्हणून मनोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशन्वये नीता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, मनोर पोलीस ठाणे, व अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सुचना दिल्या नमुद गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोणताही पुरावा अथवा धागेदोरे नसताना कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करुन चार संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी केली असता नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना अटक करुन त्यांचे कडून एकूण 3,24,000 /- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशन्वये नीता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल विभुते, पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोउपनि - गणपत सुळे, स्वप्निल सावंतदेसाई, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
◾️यावेळी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, वरील प्रकारचे बतावणीच्या गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने अशा प्रकारे अनोळखी व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये व अशा प्रकारांना बळी पडू नये. तसेच असे बतावणी करणारे संशयीत इसम मिळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाणेस, डायल 112 अथवा नियंत्रण कक्ष पालघर येथे कळवावे.
नियंत्रण कक्ष हेल्पलाईन क्रमांक :02525- 205300/ 9730711119/9730811119/8669604100
Comments
Post a Comment