बोईसरची बेपत्ता एमबीबीएस विद्यार्थीनी सदिच्छा सानेची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकले

 बोईसरची बेपत्ता एमबीबीएस विद्यार्थीनी सदिच्छा सानेची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकले.

पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारी आणि मुंबईतील सर जे. जे. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या सदिच्छा साने ही विद्यार्थीनी १४ महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली होती यात तिचा तपास सुरु असताना तिचे शेवटचे लोकेशन हे मुंबईतील वांद्रे बँडस्टॅण्ड या ठिकाणी पोलिसांना सापडले होते.

त्याअनुषंगाने मिट्टू सिंह हा सदिच्छाला भेटणारा शेवटचा व्यक्ती होता व त्याने तिच्यासोबत सेल्फी देखील काढली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. पोलिसांकडे ठोस पुरावे नसल्यामुळे त्याला अटक करता येत नव्हती त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर तो पोलिसांच्या विरोधात मानव अधिकाराची धमकी देत होता. अखेर १४ महिन्यांनी पोलिसांच्या हाती काही तांत्रिक पुरावे मिळून आल्यानंतर त्याच्या विरोधात लुटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

त्यानंतर काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु असताना तो पोलिसांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या काही तांत्रिक पुराव्यावरून गुन्हे शाखेने त्याची उलटत तपासणी सुरू केली असता या उलटतपासणीत तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याने सदिच्छा हिची हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली पोलिसांना दिली या प्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचे कलम लावण्यात आले आहे.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी