बोईसर पोलीसांची उत्तम कामगिरी : बॅंक ऑफ बडोदामध्ये चोरी करण्याऱ्या चोरांना पकडण्यात पोलीसांना यश
बोईसर पोलीसांची उत्तम कामगिरी : बॅंक ऑफ बडोदामध्ये चोरी करण्याऱ्या चोरांना पकडण्यात पोलीसांना यश
पालघर : दिनांक 29/12/2022 रोजी सायंकाळी 19.00 वा ते दिनांक 30/12/2022 रोजी सकाळी 9.00 वाजता च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी बैंक ऑफ बडोदा, शाखा बोईसर या बँकेच्या खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटुन खिडकी पलीकडे असलेल्या स्ट्रॉग रुमचा एक्झॉस्ट फॅन काढून त्यातून बँकेत प्रवेश केला. बँकेच्या स्ट्रॉगरूममध्ये लॉकरच्या समोर ठेवलेल्या 20 रूपये भारतीय चलनी नाण्याच्या एकूण 05 प्लास्टिक बैग ( प्रत्येक बैगमध्ये रूपये 40,000/- असलेल्या) त्यातील एकूण दोन लाख रूपये रोख रक्कम चोरी करुन नेले म्हणून फिर्यादी करीम सलीम ईराणी (मैनेजर) यांच्या फिर्यादीवरून बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यांची गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार बोईसर उपविभागीय अधिकारी नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे यांनी वेगवेगळी पथके तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिस ठाण्यात असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद सुरळकर व पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मणिकेरी तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार यांची तपास पथक तयार करून तपासाबाबत सुचना देण्यात आल्याप्रमाणे सदर तपास पथकाने प्राप्त सिसिटिव्ही फुटेजच्या साह्याने दोन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न होताच आरोपी क्रमांक १. शिवनारायण रामसेवक गौतम वय २२ वर्ष आरोपी क्रमांक २. सुनिल गणेश शहा वय १९ वर्ष दोन्ही राहणार सालवड - शिवाजी नगर ता व जिल्हा पालघर, मुळ राहणार बिहार राज्य यांना ताब्यात घेऊन १,८०,००० मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर करत आहेत.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये नित्यानंद झा, सहा.पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप कसबे, प्रभारी अधिकारी बोईसर पोलीस ठाणे, पोउपनि - शरद सुरळकर, विट्ठल मणिकेरी, पोहवा - सुरेश दुसाणे, विजय दुबळा, शरद सानप, पोना - संदीप सोनावणे, योगेश गावीत, पोशि - संतोष वाकचौरे, देवेंद्र पाटील, धीरज साळुंखे, मयूर पाटील, मच्छीद्र घुगे सर्व नेमणुक बोईसर पोलीस ठाणे यांनी यशस्विरित्या पार पाडली.
Comments
Post a Comment