इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची कॉइल चोरणारे पोलीसाच्या ताब्यात

 इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची कॉइल चोरणारे पोलीसाच्या ताब्यात 


जव्हार : जव्हार तालुक्यातील चोरीच्या गुंन्ह्यातील अज्ञात आरोपींना अटक करुन वेगवेगळ्या गुन्ह्याची उकल करण्यात जव्हार पोलीसांना यश आले आहे.

दिनांक 03/08/2022 रोजी फिर्यादी भालचंद्र पांडुरंग पवार,वय 42 वर्ष, व्यवसाय - नोकरी ( प्रधान तंत्रज्ञ ) रा. जव्हार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर मधील 15,000/- रूपये मुद्देमाल असलेल्या ताब्याचे कॉइल अज्ञात चोरट्यानी चोरुन घेऊन गेले म्हणून जव्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरील प्रकारच्या वाढत्या गुन्ह्याचे प्रमाण लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर  यांचे आदेशान्वये संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, अतिरिक्त चार्ज जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर संखे, पोलीस निरीक्षक, जव्हार पोलीस ठाणे यांना पथक तयार करुन गुन्हयाचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या. नमूद गुन्ह्यात कोणताही पुरावा अथवा धागेदोरे नसताना कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करुन तीन संशयीत आरोपीना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता गुन्हा कबूल करुन  त्यांनी जव्हार पोलीस स्टेशन अंतर्गत सहा वेगवेगळ्या रजि. गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तीनही आरोपी यांना अटक केली असून त्यांच्याकडून वरील वेगवेगळ्या गुन्ह्यात  एकूण 64,740/- रूपये किमतीचा मुद्देमाल व दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर  यांचे आदेशान्वये संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, अतिरिक्त चार्ज जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर संखे, पोलीस निरीक्षक, जव्हार पोलीस ठाणे, पोउपनि - जितेन्द्र अहिरराव, केशव खादे, पोना -भोये,भोगाडे, वारंगडे, पोअंम - काकड, बोरसे सर्व नेमणुक जव्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी