बोईसर-चिंचणी मध्ये 'आकार अभिव्यक्ति 2022 'कला व साहित्य स्पर्धेचे आयोजन
बोईसर-चिंचणी मध्ये 'आकार अभिव्यक्ति 2022 'कला व साहित्य स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेत भाग घेण्यासाठी ७५०६०२८९०५ या क्रमांकावर whats app द्वारे संपर्क साधा.
बोईसर : आकार्स एज्युकेशन सेंटर तर्फे बोईसर-चिंचणी मध्ये कला-साहित्य स्पर्धा दिनांक 22 जानेवारी 2023 रविवार रोजी ' आकार अभिव्यक्ति 2022 ' या विविधरंगी कला व साहित्य स्पर्धा इयत्ता 11 व 12 वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आली आहे.
आकार्स एज्युकेशन सेंटर बोईसर-चिंचणी तर्फे आकरावी व बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविधरंगी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असुन यात चित्रकला, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व, अभिनय, मिमिक्री, गायन, वादन, काव्य लेखन, काव्य वाचन, नृत्य, निबंध लेखन इत्यादीचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशाची अंतिम तारिख दि. १५ जानेवारी असुन सर्व गटांमध्ये मर्यादित प्रवेश स्विकारले जातील व प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
सदर स्पर्धा बारावीच्या परिक्षेआधी अभ्यासाचा आलेला थकवा दूर करणे व मनातील भावना व्यक्त करुन दडपण कमी करणे या उद्देशाने "आकार अभिव्यक्ती 2022 " या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा या रविवार दि. २२ जानेवारी रोजी चिंचणी बीच व आकार्स एज्युकेशन सेंटर, चिंचणी येथे पार पडणार आहे त्यामुळे अधिक माहितीसाठी ७५०६०२८९०५ या क्रमांकावर whats app द्वारे संपर्क साधावा.
Comments
Post a Comment