रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी व वाहतुकीच्या नियमाचे प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारच महत्वाच पाउल
रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी व वाहतुकीच्या नियमाचे प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारच महत्वाच पाउल
बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, यांच्या शुभहस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
पालघर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत '34' वे रस्ता सुरक्षा अभियान 2023' साजरा करण्या बाबत सूचित करण्यात आले आहे. त्याअनुषगाने पालघर जिल्हा पोलीस, जिल्हा वाहतुक शाखा पालघर यांच्या वतीने दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत प्रथमच रस्ता सुरक्षा अभियान 2023 साजरा करण्यात येणार आहे. मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते.
दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे उद्घाटन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, यांच्या शुभहस्ते पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, शैलेश काळे, पोलीस उप अधीक्षक (गृह ) पालघर, पंकज पाटील, मुख्याधिकारी पालघर नगरपरिषद पालघर, उज्वला काळे नगराध्यक्ष पालघर, अनिल विभुते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, आसिफ बेग, प्रभारी अधिकारी वाहतुक शाखा पालघर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर कार्यक्रमात बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, यांनी पालघर जिल्ह्यातील उपस्थित असलेले दुचाकी / चारचाकी वाहन धारक यांना वाहतुक नियमांचे काटेकोर पालन करणे, अपघातास आळा घालणे, अपघातग्रस्ताना पाल्याना आपले वाहन चालविण्याकरीता ताब्यात देवू नये अशा विविध मुद्यावर मार्गदर्शन केले.
रस्ता सुरक्षा अभियान 2023 या अंतर्गत पालघर जिल्ह्यात सर्व विभागामध्ये खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.यात पालघर जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी बैनर्स लावणे व महत्वांच्या ठिकाणी चौकसभा घेवून वाहन चालकाना मोटार वाहन कायदा व सुरक्षितरित्या वाहन चालविण्याची माहिती देणे. बेकायदेशिर वाहन चालविणारे वाहन चालकावर प्रतिबंध आणण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे, हेल्मेट न परिधान करता वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे, सिग्नल तोडणारे, लायसन्स नसणारे इसमाविरुद्ध विशेष मोहिम राबवून कारवाई करणे, शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन, रस्ते सुरक्षा विषयावर शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जावून प्रबोधन करणे,नागरिकांना लायसन्स व परवाना काढणेबाबत जनजागृती करणे, रस्ते सुरक्षेबाबत निबंध, चित्रकला तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करणे, वाहन चालकासाठी वाहतुक प्रबोधपर कार्यशाळा आयोजित करणे, वाहन चालक व पोलीस अंमलदार यांचेसाठी ताणतणाव शिबिराचे आयोजन करणे, मोटारसायकल रायडर करणाऱ्या वाहन चालकांना रस्ते सुरक्षेबाबत व ओव्हर स्पीड व इतर वाहतुक नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना वाहतुक नियमाचे तसेच अपघातातील जखमिंचा जिव वाचविणे व त्यांचेवर तातडिचे उपचार करणे याबाबत जनजागृती मार्गदर्शन व प्रबोधन करणे, तसेच महामार्गावरून जाणाऱ्या वाहनाना तसेच बैलगाड्याना रिफलेक्टर लावणे, मुख्य रस्ते व महामार्गावर, हद्दीतील रुग्णालये, एंबुलेंस, क्रेन, स्थानिक पोलीस ठाणे यांची दूरध्वनी क्रमांकाचे बोर्ड लावणे, बाइक रैली काढून वाहतूक नियमांची जनजागृती करणे अश्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
यावेळी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, रस्ता सुरक्षीततेविषयी जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत वरीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार असुन सदरचे अभियान यशस्वी करण्याकरीता सर्व नागरीकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून पोलीसांना सहकार्य करावे.
Comments
Post a Comment