नमो नमो मोर्चा भारत तर्फे बोईसर मध्ये कवि संम्मेलन व पत्रकार सन्मान कार्यक्रम आयोजित
नमो नमो मोर्चा भारत तर्फे बोईसर मध्ये कवि संम्मेलन व पत्रकार सन्मान कार्यक्रम आयोजित
बोईसर : नमो नमो मोर्चा भारत तर्फे कवि संम्मेलन व पत्रकार गौरव सन्मान कार्यक्रम पाणी टाकी टिमा हॉल, बोईसर येथे आयोजन करण्यात आले होते.
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी नमो नमो मोर्चा भारत तर्फे कवि संम्मेलन व पत्रकार गौरव सन्मान कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली नमो नमो मोर्चा भारत च्या पालघर जिल्ह्यातील कार्यकत्यानी बोईसर टीमा हॉल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात कवि डॉ. रजनीकांत मिश्रा (हास्य कवि, गीतकार, अभिनेता ), ज्योती त्रिपाठी ( वीररस कवियत्री ), अनुराग अंकुर ( लेक्चर, कवि व राष्ट्रीय कवि सम्मेलनो का सूत्र संचालन ) उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक शोभा श्रीवास्तव ( नमो नमो मोर्चा भारत - महिला संघटन महामंत्री ) यांनी करुन सर्व उपस्थित कवि, प्रमुख पाहुणे,पत्रकार तसेच उपस्थित लोकांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कवि संम्मेलनात देशभक्ति, देशाचे सैनिक, तसेच महाराणा प्रताप सिंह या वर कविता, गाणे व शायरी करत मनोरंजनात कार्यक्रम पार पडला.
बोईसर मध्ये पहिल्यांदाच अश्या प्रकारच कवि संम्मेलन ठेवण्यात आल आहे आणि पुन्हा एकदा कविना बोईसर मध्ये बोलवुन मोठ कार्यक्रम आयोजित करू असे -बाळासाहेबाच्या शिवसेनेचे जगदीश धोडी यांनी सांगितले.
त्यानंतर सर्व उपस्थित लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून उत्तम कामगिरी करत असलेल्या पत्रकारांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जगदीश धोडी, नमो नमो मोर्चा भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यप्रकाश सिंह, राष्ट्रीय संगठन महामंत्री व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोपान उंडे पाटिल, आर.के दिवाकर राष्ट्रीय उपाध्यक्ष,एड.विकास थोराट राष्ट्रीय सलाहकार, सतीष खर्डे राष्ट्रीय समन्वयक, आरबी सिंह राष्ट्रीय मंत्री, उद्योजक रविकांत पाण्डेय, संतोष कुमार उपाध्याय एच.बी.यादव, नारायण ,अजय झा, प्रदीप समाजसेवी, जितेंद्र अग्रवाल ,सज्जन लाला गुप्ता, स्वामी नाथ पाण्डेय,शोभनाथ त्रिपाठी, श्रीराम पाण्डेय, प्रवीण भानुशाली, बजरंग दल चे जिल्हा संयोजक चंदन सिंह,विहिप प्रखंड प्रमुख एसपी सिंह, मोर्चा चे प्रदेश पदाधिकारी सूर्यप्रकाश सिंह, वैभव घ़ोसलकर, जिल्हा पदाधिकारी विजयशंकर तिवारी,देवेंद्र सिंह, दिनेश पाठक,महिला पदाधिकारी कुसुम तिवारी, अनुपमा मिश्रा व युवा टीम चे अखिलेश चौबे, अमरेंद्र चौधरी, सोबान सिंह, मोनू शर्मा, अनीश सिंह, मनीष यादव हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment