प्रजासत्ताक दिना निम्मीत पाम ग्रामपंचायत तर्फे गावात क्रिकेट सामन्याचे आयोजन

 प्रजासत्ताक दिना निम्मीत पाम ग्रामपंचायत तर्फे गावात क्रिकेट सामन्याचे आयोजन

26 जानेवारी 2023 मध्ये सुतार आळी संघाने विजेतेपद तर श्री कृष्ण नगर संघाने उपविजेतेपद मिळवले आहे.

पालघर : पाम ग्रामपंचायत तर्फे सालाबादप्रमाणे या वर्षीही 26 जानेवारी  प्रजासत्ताक दिनानिम्मीत क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते यात 10 संघाने सहभाग घेतला होता त्यामध्ये गावातील पाटील आळी, कन्हया आळी, श्री कृष्ण नगर, वान्या आळी, आनंद आळी, सुतार आळी, हनुमान आळी, आंबेडकर नगर अश्या गावातील अलग अलग आळीतुन टीम तयार करून क्रिकेट सामने खेळवण्यात आले. यात काही आळीतुन 2 संघ ही खेळवण्यात आले होते. यात सामने मात्र चूरशी व मनोरंजनात पार पाडले असुन तरुणांनी क्रिकेट सारख्या सांघिक खेळातून एकता जोपासली असे दिसून आले.तसेच ग्रामपंचायत चे उपसरपंच मनोज रमेश पिंपळे यांच्या कडून विजेता संघाला 21,000 रूपये व उपविजेता संघाला 11,000 रूपये बक्षीस देण्यात आले होते त्यामुळे पहिल्यादाच 26 जानेवारी ला एवढ मोठ बक्षीस देण्यात आले असुन सर्व खेळाडू उत्साहीत होते व त्यामुळेच सर्व संघ जिकण्यासाठी प्रयन्त करीत होते यात सुतार आळी संघ विजेता असुन श्री कृष्ण नगर यांनी उपविजेतेपद मिळवले आहे.

सदर क्रिकेट सामन्याच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच दर्शना पिंपळे, उपसरपंच मनोज पिंपळे तसेच सदस्य भारती राउत, मनीष जाधव, मनीष संखे, रोहित पाटील, स्वेता संखे तसेच माजी उपसरपंच, सदस्य, वरिष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थित मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व बक्षीस वितरणाला सुरवात करण्यात आली.

 या अटीतटीच्या सामन्यात मान्यवर पाम ग्रामपंचायत सरपंच दर्शना पिंपळे हस्ते प्रथम पारितोषिक संघ सुतार आळी यांनी जिंकल्या मुळे त्यांना सुंदर चषक व उपसरपंच मनोज पिंपळे यांनी 21,000/- रूपये रोख देण्यात आले. द्वितीय पारितोषिक उपसरपंच मनोज पिंपळे यांच्या हस्ते श्री कृष्ण नगर यांना सुंदर चषक व 11,000/- रुपये रोख देण्यात आले तसेच बेस्ट बॉलर - प्रणय संखे ( सुतार आळी ), बेस्ट बेस्टमन - सौरभ किणी (श्री कृष्ण नगर ), मालिकवीर - अमित संखे ( सुतार आळी) यांना सुंदर चषक देण्यात आले.

तसेच मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा देऊन जिंकून आलेल्या खेळाडुचे कौतुक केले व ग्रामपंचायती द्वारा आयोजित सामन्याचे नियोजन हे आंबेडकर नगर मुलांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी