अनैतिक संबंधातुन झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपींना 12 तासाच्या आत अटक करण्यात वाडा पोलीसांना आले यश
अनैतिक संबंधातुन झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपींना 12 तासाच्या आत अटक करण्यात वाडा पोलीसांना आले यश
पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात दिनांक 20/01/23 रोजी रात्री 12 वाजतेच्या सुमारास वाडा पोलीस ठाणे हद्दीतील कोंढले बांधनपाडा, ता. वाडा येथे राहणारा संतोष रामा टोकरे, वय -35 वर्ष हा त्यांच्या घराच्या बेडरूम मध्ये झोपलेला असताना झोपेतच त्याचा मृत्यु झाल्याबाबत आंनता रामा टोकरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वाडा पोलीस ठाणे येथे अ.मृ रजि.नं 09/2023 फौ.प्र.सं कलम 174 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर मयताच्या प्रेताचे शवविच्छेदन केले असता मयताचे डोक्यात कोणत्यातरी टणक हत्याराने मारुन डोक्यात अंतर्गत दुखापती करून व त्याचा गळा दाबून खून केल्याबाबत वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, वाडा यांनी अभिप्राय दिला. त्यावरुन वाडा पोलीस ठाण्यामध्ये कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन वेगवेगळी तपास पथके तयार करुन तपासाबाबत सुचना दिल्या आणि प्राथमिक तपासात नमूद मयत इसमाचा अनैतिक सबंधातुन खून झाला असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रीक पूराव्याच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसताना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी क्र 1) वय 36 वर्ष रा.कंचाडपैकी, पांढरेपाडा 2) वय 30 वर्ष रा. कंचाडपैकी, फणसपाडा 3) वय 27 वर्ष रा. काटी 4) वय 22 वर्ष रा. वाघोटे व महिला आरोपी क्र 5) वय 36 वर्ष रा. कोंढले, बांधनपाडा असे सर्व आरोपी वाडा तालुक्यातले असुन यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून 12 तासाच्या आत गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. तसेच सर्व आरोपींना अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा अधिक तपास हा दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक वाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, पकंज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, अतिरिक्त चार्ज जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ पाटील, पोलीस निरिक्षक, वाडा पोलीस ठाणे, सपोनि - विलास जाधव, नेमणुक वाडा पोलीस ठाणे, पोउनि - गणपत सुळे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Comments
Post a Comment