रेल्वेने प्रवास करण्याऱ्या प्रवासांचे मोबाईल,पॉकेट चोरी करणारा रेल्वे पोलीसांच्या ताब्यात

 रेल्वेने प्रवास करण्याऱ्या प्रवासांचे मोबाईल,पॉकेट चोरी करणारा रेल्वे पोलीसांच्या ताब्यात 

रेकॉर्ड वरील आरोपीला पकडण्यात रेल्वे पोलीसांना आले यश 


पालघर : दिनांक 26 जानेवारी 2023  रोजी आकाश रविंद्रनाथ दुबे (वय 29 वर्ष ) रा. मुलुंड हा पालघर स्टेशन वरून मुलुंड येथे जाण्याकरीता रेल्वेने प्रवास करीत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या पैन्टच्या खिशातील पॉकेट जबरीने काढून चोरुन नेल्याबाबत पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

त्याअनुषंगाने फिर्यादी आकाश दुबे यांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे व गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती घेऊन सदर गुन्हा करणारा आरोपी रोहित प्रकाश बिष्ट ( वय - 27 वर्ष ) रा. बोईसर याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणून त्यांच्याकड़े तपास केला असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून मा. न्यायालयात रिमांड कामी हजर करुन त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली नंतर बुद्धिकौशल्याने तपास केला असता त्याने पालघर रेल्वे पोलीस ठाणे रजिस्टर गुन्ह्यातील मोबाईल फोन चोरी केला असल्याचे सांगितले व त्याच्या राहत्या घरातून मोबाईल फोन हस्तगत करून मा. न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. नमुद आरोपी हा रेल्वे आयुक्तालयातील रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याच्यावर अंधेरी, वसई, रेल्वे पोलीस ठाणे येथे यापूर्वीही गुन्हे नोंद आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त सो.लोहमार्ग मुंबई, रविंद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त सो. संदीप भाजीभाकरे, व सहाय्यक पोलीस आयुक्त सो. वसई विभाग लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोनि - नरेश रणधीर, पोउपनि - मुडावदकर, पोना - विशाल गोळे, राहुल भोईटे, पोशि - अजय शेंदगे, अतुल कुटे, शरणबसप्पा, धमदे व दिपक डावखर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी