पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तन बंदीच्या प्रकरणात :अधिकारी गजानन गुरव यांची हकालपट्टी !*
*पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तन बंदीच्या प्रकरणात :अधिकारी गजानन गुरव यांची हकालपट्टी !* *हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या विरोधाला यश* पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनमानी कारभार करत भजन, कीर्तन आणि नामजप करण्यास बंदी घालणार्या सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची महाराष्ट्र शासनाने उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत केले . गजानन गुरव यांनी कोणताही लेखी आदेश न काढता, बैठक न घेता, कोणालाही विश्वासात न घेता केवळ तोंडी आदेशाद्वारे अचानक श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तनावर बंदी घालण्यात आली होती. याचा हिंदु जनजागृती समिती आणि समस्त वारकरी संप्रदायाने तीव्र निषेध केला होता. श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन नाही करायचे तर कुठे करायचे ? असा प्रश्न करत देवस्थान समितीमध्ये विठ्ठलाचे भक्त अधिकारी-कर्मचारी असावेत आणि गजानन गुरव यांना मंदिर समितीतून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली होती. ही मागणी शासनाने मान्य केली आणि आदेश काढून गुरव यांची या पदावरून हकालपट्टी केली. त...