दोन अल्पवयीन मुलींची वेश्या व्यवसायातुन पालघर पोलीसांनी केली सुटका
दोन अल्पवयीन मुलींची वेश्या व्यवसायातुन पालघर पोलीसांनी केली सुटका
पालघर- :पालघर शहरामध्ये बोईसर येथील अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या अशोक लालचंद जैन यास पालघर पोलिसांनकडून अटक करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लालचंद जैन वय 50 वर्ष हा पालघर शहरात राहत असून तो पालघरमधील एका फ्लॅटमध्ये हा वेश्याव्यवसाय चालवत होता. बोईसर येथील दोन अल्पवयीन मुलींना आणून त्यांना जैनने व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. ही माहिती पालघर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक उमेश पाटील व त्यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकून या दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले आहे. या प्रकरणात अशोक जैन याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमासह बालकांचे लैंगिक अत्याचार कायद्यानुसार व इतर कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत.
Comments
Post a Comment