महामार्गावरील अपघात रोखने करीता पोलीस अधीक्षक यांनी घेतली नेशनल हाईवे अथॉरिटी यांची बैठक

महामार्गावरील अपघात रोखने करीता पोलीस अधीक्षक यांनी घेतली नेशनल हाईवे अथॉरिटी यांची बैठक 


पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेत बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी होत असलेले अपघात रोखण्यासाठी दिनांक 26/09/2022 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), महामार्ग देखरेख ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाची एकत्रीतपणे बैठक बोलावण्यात आली होती.

सदर बैठकीमध्ये महामार्गावरील असलेल्या अपघात प्रवण (ब्लैक स्पॉट) क्षेत्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात महामार्गावर पालघर जिल्ह्यात एकूण 15 अपघात प्रवण क्षेत्र आहेत. या अपघात प्रवण क्षेत्र याठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी सूचना फलक लावणे, अनधिकृत रोड कटिंग बंद करणे, वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलर स्ट्रीपस लावणे. रस्त्याच्या बाजूला वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येण्यासाठी कैट आईज, डेलीनेटर्स ब्लीकर्स, महामार्गावरील पडलेले खड्डे भरणे अशा उपाय योजना करण्याचे सूचविले आहे. तसेच ही सर्व नमूद उपाययोजना या तीन आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमीना रुग्णालयात उपचाराकरीता घेवून जाण्याकरीता तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही याकरिता महामार्गावरती एकूण वेगवेगळ्या चार ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे. व अपघात ग्रस्त वाहने तात्काळ महामार्गावरून बाजूला करण्यासाठी क्रेन उपलब्ध करुन देणे. त्याचप्रमाणे अग्निशमक पथक हे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडून एनआयए या माध्यमातुन उपलब्ध करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी