पालघर जिल्ह्यात एकदिवशीय पोलीस पाटील मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रम संपन्न

 पालघर जिल्ह्यात एकदिवशीय पोलीस पाटील मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रम संपन्न 

महाराष्ट्रात प्रथमच पालघर जिल्ह्यात पालघर पोलीसांकडून पोलीस पाटलांसाठी नविन गणवेश 


पालघर :पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन जिल्ह्यात प्रथमच सुरु केलेल्या जनसंवाद अभियान 2022 अंतर्गत गाव आणि प्रशासन यातील महत्वाचा दुवा असलेले पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषगाने 23/09/2022 रोजी  जिल्हा नियोजन कार्यालय पालघर येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.


सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील एकूण 244 पोलीस पाटील हजर होते व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकडमी नाशिक येथील विधि निदेशक संजय पाटील यांना आंमत्रित करण्यात आले होते.

पोलीस पाटील हा गावपातळीवरचा महत्वाचा घटक आहे. प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. तसेच गावात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता कशी राहिल तसेच महिलाच्या तक्रारी, गावात झालेले अ नैसर्गीक मृत्यु, अपघात, संशयस्पद मृत्यु, अवैध धंदे, गुन्हेगारी , दरोडे या विषयी सर्व माहिती पोलीस पाटलांनी सतर्क राहून सर्व संबधित पोलीस यंत्रणेला पुरवावे तसेच पोलीस पाटील यांचे गावस्तरावर कोणती जबाबदारी असते? त्यांची काय कर्तव्य असतात? व ती कशाप्रकारे पार पाडायची?याबाबत संजय पाटील विधि निदेशक महाराष्ट्र पोलीस अकडमी, नाशिक, बाळासाहेब पाटील,  पोलीस अधीक्षक पालघर, दिलीप गुट्टे, अपर जिल्हाधिकारी पालघर तसेच प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पालघर  यांनी उपस्थित सर्व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले.

तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांच्यात एकसूत्रता येण्यासाठी व कोणताही प्रशासकीय अधिकारी गावामध्ये गेला असता पोलीस पाटील यांचे जनमाणसात वेगळेपण दिसून यावे व सहज ओळखता यावे याकरीता पोलीस पाटील यांना निळ्या रंगाचे जैकेट प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात प्रथमच पालघर पोलीसाकडून पालघर जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम हा बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, दिलीप गुट्टे, अपर जिल्हाधिकारी पालघर, किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी पालघर, प्रकाश गायकवाड,अपर पोलीस अधीक्षक पालघर,नित्यानंद झा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग, नीता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग, शैलेश काळे, पोलीस उपअधीक्षक (गृह ) पालघर, तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांच्या उपस्थितित पार पडला.

 


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी